Coastal Erosion: गोवा सरकारचे मोठे पाऊल! धूप रोखण्यासाठी नेदरलँडमधील तंत्राचा वापर; ‘सॅण्ड मोटर’ ने किनारे राहणार सुरक्षित

Goa Coastal Erosion: धूप समस्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने एक नवे पाऊल उचलले असून, नेदरलँड्समध्ये यशस्वी ठरलेले ‘सॅण्ड मोटार’ तंत्रज्ञान गोव्यात वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
Goa Beach Coastal Erosion
Goa Beach Coastal ErosionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याच्या किनारपट्टीवर दिवसेंदिवस वाढत चाललेली धूप, या समस्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने एक नवे पाऊल उचलले असून, नेदरलँड्समध्ये यशस्वी ठरलेले ‘सॅण्ड मोटार’ तंत्रज्ञान गोव्यात वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या नवकल्पनात्मक तंत्रज्ञानामुळे किनाऱ्यांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

गोव्याच्या किनाऱ्यांची धूप होण्यापासून वाचवण्यासाठी आता विज्ञानाच्या मदतीने एक नवा मार्ग स्वीकारला जात असून, भविष्यात हे तंत्रज्ञान अन्य किनारी राज्यांसाठीही दिशादर्शक ठरू शकते. या तंत्रज्ञानाची यशस्वी अंमलबजावणी स्थानिकांच्या सहभागावरही अवलंबून असेल. म्हणूनच गोवा सरकार स्थानिक ग्रामपंचायती, पर्यावरण कार्यकर्ते व शास्त्रज्ञ यांच्या सल्ल्याने हा प्रकल्प राबवणार आहे.

नेदरलँड्समध्ये २०११ मध्ये पहिल्यांदा हे तंत्रज्ञान वापरले गेले. २१.५ दशलक्ष घनमीटर वाळू समुद्रात टाकून एक कृत्रिम भूभाग तयार केला, जो कालांतराने समुद्राच्या लाटांमुळे विस्तृत भागात विखुरला गेला व किनाऱ्यांचे संरक्षण अधिक मजबूत झाले. या प्रयोगामुळे किनाऱ्यांच्या नैसर्गिक संरचनेला धक्का न लागता दीर्घकालीन संरक्षण मिळाले.

या तंत्रज्ञानाचे फायदे काय?

पर्यावरणपूरक उपाय : कोणतेही काँक्रिट स्ट्रक्चर न उभारता नैसर्गिक साधनांचा वापर.

दीर्घकालीन परिणामकारकता : एकदाच केलेल्या प्रयत्नामुळे अनेक वर्षे टिकणारे संरक्षण.

पर्यटन व मासेमारीला चालना : किनाऱ्याचे सौंदर्य टिकून राहत असल्याने पर्यटनास पोषक.

हवामान बदलाशी जुळवून घेणारे : समुद्रपातळी वाढ, तुफानी लाटा यासारख्या बदलांशी लवचिकता.

Goa Beach Coastal Erosion
Goa Beach: गोव्यातील किनारे संकटात! धूप होण्याचे वाढले प्रमाण; पर्यटनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता

‘सॅण्ड मोटार’ म्हणजे काय?

‘सॅण्ड मोटार’ हे एक पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आहे, ज्यात मोठ्या प्रमाणात वाळू कृत्रिमरीत्या किनाऱ्याला लागून समुद्रात टाकली जाते. समुद्राच्या प्रवाहांमुळे आणि लाटांच्या नैसर्गिक गतीमुळे ही वाळू हळूहळू आजूबाजूच्या किनाऱ्यांवर नैसर्गिक पद्धतीने पसरते. यामुळे किधूप रोखण्यासाठी एक प्रकारची नैसर्गिक ढाल तयार होते.

Goa Beach Coastal Erosion
Goa Coastal Erosion: गोव्याची निसर्गरम्य किनारपट्टी 'संकटात', पर्यावरणासाठी धोक्याची घंटा; धूपीने उत्तर गोवा सर्वाधिक प्रभावित

गोव्यातील अंमलबजावणी

गोवा सरकारने या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून प्रारंभी निवडक किनाऱ्यांवर त्याची चाचणी घेण्याचे ठरवले आहे. सध्या धूपग्रस्त काही भागांमध्ये समुद्रशास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली सॅण्ड मोटारसाठी आवश्यक वाळूची मात्रा, समुद्रप्रवाहांचे विश्लेषण व स्थानिक पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa beach shack law constitutional validity
Galjibaga Beach Erosion Goa
Goa Beach Shack 20 Lakh Fine
Goa Shack Registration
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com