Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ''महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक...''; सरदेसाईंचा घणाघात

Vijay Sardesai Criticized Sawant Government: महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक गप्प बसणार नाहीत. असे म्हणत गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाईंनी हल्लाबोल केला.

Manish Jadhav

पणजी: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने अभूतपूर्व यश संपादन केले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक गप्प बसणार नाहीत. असे म्हणत गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी हल्लाबोल केला.

भाजपला (BJP) गोव्यातील विरोधकांना संपवायचंय, पण ते अशक्य आहे, असेही सरदेसाईंनी यावेळी बोलताना नमूद केले. रविवारी (24 नोव्हेंबर) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विजय सरदेसाई आणि कार्लुस फेरेरा यांनी पत्रकार परिषद घेवून राज्यातील भाजप सरकारवर टीकास्त्र डागले. सरदेसाई यांनी सावंत सरकारचा चांगलाचं समचार घेतला. विरोधकांनी 2027 मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभेच्या निवडणूकीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे.

सरदेसाईंनी एवढ्यावरचं न थांबता राज्यात मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणावरुन पुन्हा एकदा सावंत सरकारला निशाण्यावर घेतले. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लुटल्याची प्रकरणे म्हणजे भारतातील (India) व्यापम 2. आहे. आम्ही पोलिसांकडून पारदर्शक तपासाची अपेक्षा करतो, असे म्हणत सरदेसाईंनी सरकारला घेरले

महायुतीचा बोलबाला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला धोबीपछाड देत घवघवीत यश मिळवले. विधानसभा निवडणुकीचा निकाल जणू काही एकांगी लागला. महायुतीचे शिलेदार या निवडणुकीत पायाला भिंगरी लावून पळाले. तर या यशात संघाने सिंहाचा वाटा उचलला. महायुतीला 288 जागांपैकी 230 इतक्या विक्रमी जागा मिळाल्या. राज्यातील महायुतीच्या विरोधातील लाटेचा महाविकास आघाडीला फायदा होईल अशी शक्यता राजकीय तज्ञांनी वर्तवली होती. मात्र निकालाने राजकीय तज्ञांची ही शक्यताही फोल ठरवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT