Uday Madakaikar and Tony Rodriguez are loyal colleagues of Babush Monserrat Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: उदय मडकईकर व टोनी रॉड्रिगीजा कॉग्रेसमध्ये प्रवेश

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजी महापालिकेचे (Panajim) माजी महापौर उदय मडकईकर (Uday Madakaikar) व टोनी रॉड्रिगीस (Tony Rodriguez) यांचा काँग्रेस (Congress) प्रवेश यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी गोवा कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पणजीचे विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात (Babush Monserrat) यांच्यासाठी जोरदार धक्का ठरणार आहे.

उदय मडकईकर हे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक असून टोनी रॉड्रिगीस हे माजी महापौर आहेत. दोघेहि बाबूश मोन्सेरात यांचे विश्वासू सहकारी आहेत. उदय मडकईकर हे पणजी मतदार संघातून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना आव्हान देणार आहेत. तर टोनी रॉड्रिगीस हे ताळगाव मतदार संघातून महसूल मंत्री तथा ताळगावच्या आमदार जेनेफर मोन्सेरात यांना टक्कर देणार आहेत.

पणजी आणि तळगाव मतदारसंघात मधून अनुक्रमे बाबूश मोन्सेरात व जेनिफर मोन्सेरात हे दांपत्य 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले होते. ज्यावेळी कॉंग्रेसचे 15 पैकी 10 आमदार भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले त्यात बाबूश आणि जेनिफर मोन्सेरात यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. जेनिफर मोन्सेरात यांना माहिती आणि तंत्रज्ञान तसेच महसूल ही महत्त्वाची खाती देण्यात आलेली आहेत. त्यामुळे पणजी आणि ताळगाव मध्ये काँग्रेसकडे मजबूत असे उमेदवार नव्हतेच. ताळगावातील नाराज भाजप नेते दत्तप्रसाद नाईक हे सध्या गप्प राहिले असून पणजी मधून भाजपची उमेदवारी बाबूश मोन्सेरात यांना नक्की झालेली असल्यामुळे माजी आमदार सिद्धार्थ कुकळ्येंकर व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांच्या भूमिकेकडे लोकांचे लक्ष लागून राहिले असले तरी सिद्धार्थ कुकळ्येंकर व उत्पल पर्रीकर हे भाजपाची साथ सोडून इतर पक्षात प्रवेश करणार नाहीत याची जाणीव भाजपचा नेतृत्वाला आहे.

जर बाबूश मोन्सेरात यांनी भाजप सोडला तरच सिद्धार्थ किंवा उत्पल यापैकी एकाला भाजपची उमेदवारी पणजीतून मिळू शकते . मात्र सध्याचे वातावरण पाहता व बाबूश यांनीही आपण भाजप पक्षातूनच राजकारणातून निवृत्त होणार असल्याचे जाहीर केलेले असल्यामुळे पणजीतून बाबूश मोन्सेरात व ताळगावमधून जेनिफर मोन्सेरात यांनाच 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची उमेदवारी मिळणार हे पक्के झालेले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष मोन्सेरात दाम्पत्याला टक्कर देणाऱ्या उमेदवारांचा शोध घेत होता. शेवटी त्यांचा शोध माजी महापौरपर्यंत येऊन थांबला. माजी महापौर उदय व टोनी यांनी काँग्रेसला सहामती दर्शवलेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT