Ramesh Tawadkar | Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification Petition: 'ते' आमदार अपात्र, चोडणकरांनी मांडली बाजू; अपात्रता याचिकेवरील सुनावणी पूर्ण

Goa Politics: आमदार अपात्रता प्रकरणी सभापतींसमोर याचिकादारांचा युक्तीवाद पूर्ण झाला. त्यावर 8 आमदारांना उत्तर देण्यासाठी सभापतींनी सोमवारपर्यंत मुदत दिली आहे.

Manish Jadhav

पणजी: आठ आमदारांनी कॉंग्रेसचे सदस्यत्व स्वेच्छेने सोडून त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यांनी कॉंग्रेसच्या केवळ विधीमंडळ गटात फूट पाडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे राज्य घटनेच्या 10व्या परिशिष्टातील दुसऱ्या परिच्छेदातील तरतुदीनुसार ते अपात्र ठरतात, असा दावा याचिकादार गिरीश चोडणकर यांच्या वकिलांनी सभापती डॉ. रमेश तवडकर यांच्यासमोर केला.

आमदार अपात्रता प्रकरणी युक्तीवाद पूर्ण

आमदार अपात्रता प्रकरणी सभापतींसमोर याचिकादारांचा युक्तीवाद पूर्ण झाला. त्यावर 8 आमदारांना उत्तर देण्यासाठी सभापतींनी सोमवारपर्यंत मुदत दिली आहे. मायकल लोबो, दिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई, रुडाल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर, दिगंबर कामत आणि आलेक्स सिक्वेरा या आमदारांविरोधात ही याचिका आहे. त्यांनी आपले म्हणणे सभापतींसमोर सादर केल्यानंतर चोडणकर यांच्या वकिलांनी लेखी स्वरुपात आपले म्हणणे सादर केले आहे.

सुनावणीसाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित

सर्वोच्च न्यायालयात चोडणकर यांनी दाद मागितल्यानंतर दोन वर्षे या याचिकेवर सुनावणी न घेतलेल्या सभापतींनी सुनावणीसाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यानुसार याच महिन्यात या याचिकेवर निकाल येणे अपेक्षित आहे. यापूर्वी, याच विषयावर कॉंग्रेसचे नेते डॉम्निक नरोन्हा यांनी सादर केलेली याचिका सभापतींनी फेटाळली होती. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने पक्षात फूट म्हणजे विधीमंडळ गटात फूट ही वैध ठरवल्याचा आधार सभापतींनी घेतला होता. आताही नेमक्या त्याच मुद्यांवर चोडणकर यांची याचिका बेतलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT