Chairman Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Goa MLA Disqualification Case: मोठी बातमी! 8 बंडखोर काँग्रेस आमदारांविरोधातील याचिका सभापती तवडकरांनी फेटाळली

Goa Politics News: सप्टेंबर 2022 मध्ये भाजपमध्ये सामील झालेल्या 8 बंडखोर काँग्रेस आमदारांविरुद्ध काँग्रेस नेते डॉमिनिक नोरोन्हा यांनी मांडलेली अपात्रता याचिका सभापती डॉ रमेश तवडकर यांनी फेटाळून लावली.

Manish Jadhav

Goa News: सप्टेंबर 2022 मध्ये भाजपमध्ये सामील झालेल्या 8 बंडखोर काँग्रेस आमदारांविरुद्ध काँग्रेस नेते डॉमिनिक नोरोन्हा यांनी मांडलेली अपात्रता याचिका सभापती डॉ. रमेश तवडकर यांनी फेटाळून लावली.

नोरोन्हा आणि गिरीष चोडणकर यांच्या याचिकेवर सभापती रमेश तवडकर 25 ऑक्टोबरपर्यंत आपला निकाल देणार होते. मात्र आज (14 ऑक्टोबर) सभापती तवडकरांनी नोरोन्हा यांनी मांडलेली याचिका फेटाळून लावली.

पूर्वानुभवावरुन चोडणकर सावध

याआधीच्या विधानसभेत कॉंग्रेसमधून 10 आमदार फुटून भाजपमध्ये गेले होते. विधानसभेची मुदत संपली तरी त्याबाबत निर्णय झाला नव्हता. त्यामुळे चोडणकर यांनी सभापतींना वेळेत अपात्रता याचिकेवर निर्णय घेण्याचा आदेश द्यावा, यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाद मागितली होती.

सर्वोच्च न्यायालयाने याविषयी घेतलेल्या सुनावणीवेळी सभापतींनी सध्या सुरु असलेल्या अपात्रता याचिकेवरील सुनावणीनंतर चोडणकर यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यात येईल, अशी भूमिका मांडली होती.

चोडणकरांच्या याचिकेवर नोव्हेंबरमध्ये सुनावणी

यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर येथील आमदार अपात्रता प्रकरणात 90 दिवसांत निर्णय देण्याचे निर्देश दिले होते. चोडणकर यांच्याकडून त्याकडे लक्ष वेधल्यानंतर 10 नोव्हेंबरपर्यंत चोडणकर यांच्या याचिकेवर सभापती निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करुन सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 4 नोव्हेंबर रोजी सुरु होणाऱ्या आठवड्यात ठेवली आहे.

घटनाक्रम

19-9-22 आठ आमदारांनी 2/3 गट भाजपमध्ये विलीन झाल्याचा दावा केला.

11-11-22 चोडणकर यांनी अपात्रता याचिका सादर केली.

1- 12 - 22 याचिकेवर तातडीने सुनावणीसाठी चोडणकरांचा अर्ज.

25- 1- 23 चोडणकर उच्च न्यायालयात. तातडीने सुनावणीसाठी आदेशाची मागणी.

2- 5- 23 उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. पूर्वीची याचिका प्रलंबित असल्याचे कारण दिले.

17-9- 23 चोडणकर त्याच मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात.

13-10-23 सर्वोच्च न्यायालयाच्या सभापती आणि इतरांना नोटीसा.

15-4-24 सभापतींच्या वकिलांची याचिकेवर अंतिम सुनावणी सुरु असल्‍याची माहिती.

2-9-24 सभापतींच्या वकिलांच्या विनंतीनुसार सुनावणी 8 आठवडे पुढे ढकलली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2025: अर्जुन तेंडुलकर, कौशिकचा भेदक मारा! पाहुणा संघ बॅकफूटवर; ललित यादवने टिपले 2 बळी

Stray Dogs: पर्यटकांवर हल्ला, वाढती संख्या; गोव्यात 'भटक्या कुत्र्यांच्या' समस्येबाबत होणार चर्चा, मुख्‍य सचिव घेणार अधिकाऱ्यांची बैठक

Pooja Naik: 'पूजा'कडून पैसे घेणारे मंत्री, IAS अधिकारी, अभियंता कोण? ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरण पेटणार; मुख्‍यमंत्र्यांनी दिली तपासाची हमी

Tragic Death: कार कोसळली कालव्यात, युवक गेला वाहून; अस्नोडा येथे दुर्दैवी घटनेत एकाचा मृत्यू Watch Video

Kaalbhairav Jayanti 2025: कोण सर्वश्रेष्ठ? ऋग्वेदाचे उत्तर ऐकून ब्रम्हदेव हसले, भगवान शंकरानी धड वेगळे केले; कालभैरवाच्या अवताराची कथा

SCROLL FOR NEXT