Chairman Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Ramesh Tawadkar: काहींच्‍या सावलीजवळही उभे राहायची इच्‍छा नाही! तवडकर असं का म्हणाले? राजकीय वतुर्ळात चर्चांना उधाण

Goa Politics: सभापती रमेश तवडकर यांनी सरकारमध्‍ये सर्वकाही काही आलबेल नाही हेच दाखवून दिले आहे. त्‍यांनी कोणाचे नाव घेतलेले नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: ‘काही लोकांच्‍या सावलीजवळही उभे राहायची माझी इच्‍छा नाही’ असे वक्‍तव्‍य करून सभापती रमेश तवडकर यांनी सरकारमध्‍ये सर्वकाही काही आलबेल नाही हेच दाखवून दिले आहे. त्‍यांनी कोणाचे नाव घेतलेले नाही. कला-संस्‍कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्‍याशी त्‍यांचा असलेला वाद सर्वश्रुत आहे.

मडगावात प्रसारमाध्‍यमांशी बोलताना तवडकर म्‍हणाले की, देशाप्रमाणे गोव्‍यातही काही मूठभर लोकांची अराजक शक्‍ती वावरत आहे. गोव्‍याला त्‍यापासून धोका आहे. अशा शक्‍तींपासून गोव्‍याचे संरक्षण करणे हेच आमचे ध्‍येय आहे. बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आपण जी राज्‍यव्‍यापी रॅली काढली आहे, ती म्‍हणजे यापूर्वी झालेल्‍या ‘उटा’च्‍या सभेला शक्तिप्रदर्शनातून दिलेले उत्तर आहे का? असा प्रश्‍‍न विचारला असता तवडकर म्‍हणाले की, फोंड्याच्‍या सभेचा आणि या रॅलीचा काहीच संबंध नाही.

मागची तीन वर्षे मी ही रॅली काढतोय. तीन महिन्‍यांपूर्वी या रॅलीचे आयोजन केले जाते. त्‍यामुळे ही रॅली म्‍हणजे शक्ति‍प्रदर्शन नव्‍हे, पण रॅलीला मिळणारा प्रतिसाद हा अपेक्षेपेक्षा जास्‍त आहे.

...तर माझे काय चुकले?

मुख्‍यमंत्र्यांकडे तवडकर यांनी काही मंत्र्यांबाबत तक्रार केली होती. त्‍याबद्दल त्‍यांना विचारले असता ते म्‍हणाले, सभापती हे सांविधानिक पद आहे. या पदाचा मान राखणे प्रत्‍येक मंत्र्याचे कर्तव्‍य आहे. मात्र काहीजण ताळतंत्र पाळत नाहीत. व्‍हायरल झालेल्‍या एका ऑडिओत मला अकारण ओढायचा प्रयत्‍न झाला. काणकोण येथे रवींद्र भवनाच्या उद्‍घाटनावेळी जे भाषण करण्‍यात आले, ते सर्वांनी ऐकले. तिसरी घटना परवाच्‍या ‘उटा’ मेळाव्‍याच्‍या भाषणातून समोर आली. शासकीय कार्यक्रमांतून जर अशी वक्‍तव्‍ये होत असतील तर त्‍याची दखल मुख्‍यमंत्र्यांनी घ्‍यावी असे मला वाटल्‍यास त्‍यात चूक ती काय? असा सवाल तवडकर यांनी केला.

रमेश तवडकर, सभापती

एका गटाबरोबर माझे तात्त्विक मतभेद आहेत आणि ही गोष्‍ट मी कधीही लपविलेली नाही. त्‍यांचे आणि माझे पटत नसल्‍यामुळे मी २०१२ मध्‍येच त्‍यांच्‍याशी संबंध तोडला. २०१७ ते २०२२ पर्यंत मी सत्तेबाहेर होतो. त्‍यावेळी या गटाकडून मी काय सोसले, ते मलाच माहीत. प्रत्‍येक ठिकाणी माझी मानहानी करण्‍याचा प्रयत्‍न झाला. आता मी सत्तेत आहे. काही मूठभर लोकांनी एकत्र येऊन गर्दी जमवायची, दुसऱ्यांची अवहेलना करायची आणि ते गप्‍प पाहायचे हे मला मान्‍य नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: खाणकाम मोफत मिळालेले नाही..., अमित पाटकरांचा पालेकरांना हल्लाबोल

Goa Crime: बुरखाधारी टोळीचा हैदोस! ग्रील कापून घरात घुसले अन् दाम्पत्याला बांधलं, लाखोंची रोकड अन् दागिने घेऊन झाले पसार

Nobel Prize Physics 2025: भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर! क्वांटम मेकॅनिकल टनलिंगच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांचा गौरव

IND vs WI 2nd Test: पहिला विजय झाला, आता मालिका विजयाची 'हुकमी तयारी'! दुसरा सामन्याचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर वाचा

Haryana Crime: तोकडे कपडे आणि चारित्र्यावर संशय... 18 वर्षीय भावाने बहिणीची बॅटने मारहाण करुन केली हत्या; हरियाणातील संतापजनक घटना!

SCROLL FOR NEXT