Goa Politics Dainik Gomantak
गोवा

सांगेत 'त्यांच्या' कॉंग्रेस पक्षप्रवेशामुळे स्थानिक कार्यकर्ते नाराज

कॉंग्रेस कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता वरिष्ठांनी निर्णय घेतल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी निषेध नोंदवला.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: कॉंग्रेस (Congress) कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता वरिष्ठांनी सांगेचे अपक्ष (MLA) आमदार प्रसाद गावकर यांना पक्षात घेतल्याचा आरोप काहींनी केला आहे. या निर्णयावर नाराजी व्यक्त करत काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी निषेध नोंदवला.

पत्रकार परिषदेला (Press Conference) जार्विस फर्नांडिस, राखी नाईक, जुजिनो डिकॉस्ता, संदेश कोसंबे, आपोलियानो गोम्स व इतर मान्यवर उपस्थित होते. जार्विस फर्नांडीस म्हणाले, की अकार्यक्षम आमदारामुळे सांगे मतदारसंघ पाच वर्षे मागे राहिला आहे. जो आमदार काँग्रेस पक्ष व नेत्यांवर वाईट बोलत होता, त्याला आज काँग्रेसमध्ये स्थान देण्यात आले आहे. गोव्यातील नेत्यांनी आमदारांच्या भावाला व इतर कार्यकर्त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता पक्षामध्ये प्रवेश दिला. पण दीड महिन्यानंतर त्यांनी तृणमूलची (Trinamool Congress) वाट धरली. गटाध्यक्षांनी पक्ष श्रेष्ठीकडे पाठवलेल्या चौदा नावांचा विचार पक्षश्रेष्ठींनी करावा अशी मागणी जार्विस यांनी केली.

राखी नाईक म्हणाल्या, की आ.गावकर यांच्यामुळे सांगेचा विकास खुंटला आहे. आज अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत. दोन मतदारसंघाच्या विजयासाठी झटणार असे सांगणाऱ्या गावकर यांनी या मतदार संघातील मतदारांसाठी काय केले ते अगोदर सांगावे. तर आ.गावकर यांनी विकासाच्या नावाखाली केवळ बॅनरबाजी केल्याचा आरोप जुजिनो डिकॉस्ता यांनी केला.

दिगंबर कामतांमुळे हातातून सत्ता गेली

संदेश कोसंबे म्हणाले, दिगंबर कामत यांनी सांगेतील काँग्रेस कार्यकर्त्यांचा विश्वासघात केला आहे. सुरवातीला जेव्हा काँग्रेस पक्षाकडे १६ आमदार होते, तेव्हा गोवा फॉरवर्डचे तीन व अपक्ष आमदारांना घेऊन दिगंबर कामत पक्षश्रेष्ठींकडे का घेऊन गेले नाही? तसे केले असते तर गोव्यात काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आले असते. काँग्रेसचे दहा आमदारही फुटले नसते असा दावा त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

SCROLL FOR NEXT