Rama Kankonkar Attack Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: "भाजपच्या रावण राज्यात गोमंतकीय एकत्र", मुख्य आरोपीला अटक न केल्यास NH 66 बंद!विरोधकांचा सरकारला इशारा

Rama Kankonkar Attack: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी आता सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला

Akshata Chhatre

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ, विरोधकांनी आता सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराला अटक न केल्यास काणकोणमधील राष्ट्रीय महामार्ग ६६ रोखण्याचा इशारा विरोधी पक्षनेत्यांनी दिला आहे. श्रीस्थळ-काणकोण येथे झालेल्या जाहीर सभेत सर्व विरोधकांनी एकत्र येऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

'भाजपच्या रावण राज्यात गोमंतकीय एकत्र आले'

गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी या प्रकरणी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “हा शांतताप्रिय गोमंतकीयांवरील हल्ला आहे. भाजपच्या रावण राज्याने सर्व गोमंतकीयांना एकत्र आणले आहे.” राज्यात आता ‘गुंडाराज’ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

गौड, कुणबी आणि वेळीप समाजातील लोक जेव्हा काही मागतात, तेव्हा त्यांच्यावर हल्ला होतो, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. या घटनेने गोव्यातील लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सरकारला कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

'भाजपचे गुंडाराज संपवण्याची वेळ'

यावेळी आम आदमी पक्षाचे (आप) गोवा अध्यक्ष अमित पालेकर यांनीही भाजपवर हल्लाबोल केला. "भाजपच्या या गुंडाराजाविरोधात लढण्याची आणि त्यांना सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली आहे," असे ते म्हणाले. 'गोवा अगेंस्ट गुंडाराज' (Goa Against Gundaraj) या मोहिमेअंतर्गत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

यामध्ये सर्व विरोधकांनी एकत्र येऊन सरकारकडे हल्ल्याचा सूत्रधार शोधून त्याला त्वरित अटक करण्याची मागणी केली. जर सरकारने यावर योग्य ती कारवाई केली नाही, तर राष्ट्रीय महामार्ग रोखण्याच्या इशाऱ्यावर विरोधक ठाम असल्याचे दिसून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Makharotsav in Goa: 16व्या शतकातील परंपरा, पोर्तुगीज आक्रमणातून वाचलेल्या मूर्तींचा अनोखा उत्सव; देवीच नाही तर भैरवाचाही भरतो 'मखरोत्सव'

Sattari Crime: बिहारच्या व्यक्तीवर गोव्यात अज्ञाताकडून गोळीबार, सत्तरीतील धक्कादायक घटना; परिसरात भीतीचे वातावरण

Elephant in Goa: न्हयेंन बुट्टा, शेतांन लोळ्टा! 'ओंकार' अजूनय तांबोशाच; Watch Video

Navratri Special: कामालाच आनंद मानणारी, आव्हानांना सामोरे जाण्याची ऊर्जा देणारी 'महिला उद्योजिका'; दुर्गेचे आधुनिक रुप

Seva Pakhwada: राज्याच्या, देशाच्या प्रगतीचे चित्र उमटललेल्या कलाकृती; 21 व्या शतकातील भारत आणि गोवा प्रदर्शन

SCROLL FOR NEXT