NCP Leader Churchill Alemao Dainik Gomantak
गोवा

काँग्रेसला चर्चिलचे युतीबाबत 'फायनल अल्टीमेटम'

31ऑक्टोबर पर्यंत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवेल.

Dainik Gomantak

Goa Politics: निवडणुकीचे पाणी नाकापर्यंत येऊनही काँग्रेसकडून (GPCC) अजून युतीबद्दल स्पष्टता येत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव (NCP Leader Churchill Alemao) यांनी या महिन्या अखेरपर्यंत मुदत दिली आहे. 31 ऑक्टोबर पर्यंत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा आम्ही स्वबळावर निवडणूक (Goa Election 2022) लढवू असा इशारा आज त्यांनी दिला.

दोन दिवसांपूर्वी चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली होती. या भेटीत आपण पक्षाच्या दोन्ही नेत्यांना माझ्या पुढील कृतीची कल्पना दिली आहे. त्यांनी हा महिना अखेरपर्यंत वाट पाहावी असा सल्ला आपल्याला दिला आहे असे सांगितले.

मी राष्ट्रवादी पक्ष सोडणार नाही. पण काँग्रेसचे वेळकाढू धोरण मला पसंत नाही. युती झाल्यास 10 जागा राष्ट्रवादीला सोडाव्यात अशी आमची काँग्रेसकडे मागणी आहे. युती न झाल्यास किमान 26 ठिकाणी आम्ही उमेदवार उभे करू. आमचे उमेदवार तयार आहेत असे त्यांनी शुक्रवारी आपल्या वार्कां येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

आपली कन्या वालांका आलेमाव नावेली मतदारसंघातून निवडणूक लढविणारच असे स्पष्ट करताना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही तर ती अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार. वालांका अजून काँग्रेस पक्षातच आहे असे सांगत नावेलीत काँग्रेसचे आमदार लुईझींन फालेरो यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने आता हा मतदारसंघ खुला झाला आहे असे त्यांनी सांगितले.

नावेलीत अजूनही आपल्याजडे मते आहेत 2017 च्या निवडणुकीत लुईझींन फालेरो याना मीच नावेलीत निवडून आणले होते, असाही दावा त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT