Goa MGP | Anant Naik  Dainik Gomantak
गोवा

MGP Goa: फोंडा पालिका अविश्‍वास ठरावात 'मगो' पक्षाचा हात नाही; अनंत नाईकांचे परखड मत

MGP Goa: पालिकेतील अविश्‍वास ठरावाच्याबाबतीत काही लोकांकडून मगोच्याबाबतीत अपप्रचार केला जात आहे.

दैनिक गोमन्तक

MGP Goa: फोंडा पालिकेतील राजकारणात ‘मगो’ पक्षाचा कोणताही हात नसून पालिका राजकारण हे पक्षविरहित आहे. मात्र, नगरसेवकांची तोडफोड अथवा संगीत खुर्चीचा खेळ खेळण्यात मगोला कोणतेच स्वारस्य नाही, असे स्पष्ट मत मगो पक्षाचे केंद्रीय समितीचे सचिव अनंत नाईक यांनी काल फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मगो पक्ष हा भाजप सरकारचा एक घटक आहे.

दरम्यान, त्यामुळे भाजपला पालिकेच्या राजकारणात नामोहरम करण्याचा आमचा अजिबात विचार नाही, असेही अनंत नाईक यांनी सांगितले. पालिकेतील अविश्‍वास ठरावाच्याबाबतीत काही विघ्नसंतोषी लोकांकडून मगोच्याबाबतीत अपप्रचार केला जात आहे.

मगोच्या माथी पालिका राजकारण लादून एकमेकांच्या मनात संशय पेरला जात असल्याचेही अनंत नाईक यांनी सांगून पालिकेत सर्व पक्षांचे नगरसेवक आहेत, अविश्‍वास ठरावाच्या राजकारणात मगो पक्षाचा कोणताही हात नाही, असा पुनरुच्चार केला.

डॉ. केतन भाटीकर हे रायझिंग फोंडा पुरते मर्यादित आहेत. भाटीकरांनी कोणतेही विधान केले, तरी त्याचा मगो पक्षाशी संबंध नाही. निवडणुकीनंतर जर भाटीकर यांनी पक्षासंबंधी कोणतेही विधान केले असले तरी ते मगो पक्षाशी बांधील नाही.

मगो पक्षासंबंधी विधान करायचे असेल तर मगो पक्षाचे नेते किंवा मगोच्या केंद्रीय कार्यकारिणीशी बोलावे लागते. त्यामुळे केतन भाटीकर हे रायझिंग फोंडापुरते मर्यादित आहेत, असे अनंत नाईक यांनी सांगितले.

भाऊसाहेबांचे नाव प्रत्येकाच्या हृदयात!

भाऊसाहेब बांदोडकर हे गोव्याचे भाग्यविधाते आहेत. गोव्यात सुरुवातीपासून गोमंतकीयांच्या हिताचे निर्णय घेताना मोठमोठे प्रकल्प जर कुणी उभारले तर ते भाऊसाहेब बांदोडकर यांनीच, हे कुणीही गोमंतकीय नाकारू शकणार नाही.

त्यामुळेच त्यांचे नाव प्रत्येक गोमंतकीयाच्या ह्रदयात निश्‍चितच कोरले गेले आहे, अशा भाग्यविधात्याच्या नावाने आम्ही राजकारण केलेले नाही, असे मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

गोव्यात मगो पक्ष भाजप सरकारात घटकपक्ष आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या मोपासंबंधीच्या निर्णयाशी मगो पक्ष सहमत असेल, असेही दीपक ढवळीकर म्हणाले.

सुदिन ढवळीकरांवर दबाव!

ज्यांनी फोंडा पालिकेत मगोपचा गट सत्ताधारी बनविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, ते या घटनेमुळे उद्विग्न बनले आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी ‘गोमन्तक’ला सांगितले. सध्या मगोपचे प्रमुख सुदिन ढवळीकरांवर भाजपचा मोठा दबाव असून रवी नाईक यांनीच त्यांना घूमजाव करायला भाग पाडले आहे.

रवी पुत्र- रितेश नाईक यांना पायउतार व्हावे लागेल, हे स्पष्ट होते. त्यामुळे रवी नाईक यांनी भाजपपुढे लोटांगण घातले आणि ढवळीकरांवर दबाव आला. ढवळीकरांना आपले मंत्रीपद प्रिय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: तांत्रिक अडचणीमुळे फ्लाय91 पुणे-गोवा सकाळच्या विमान उड्डाणाला विलंब

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT