RGP Congress meeting issue 
गोवा

Goa Politics:"सकाळी येतो सांगून तुकाराम आलाच नाही!", RGP प्रमुखांनी काँग्रेसला पुन्हा टाळले? युतीचा 'सस्पेन्स' वाढला

Goa politics alliance:काँग्रेस नेत्यांना रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने युतीचा 'सस्पेन्स' आणखी वाढला आहे

Akshata Chhatre

RGP Congress meeting issue: गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी यांच्यातील युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा विलंब झाला आहे. रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे प्रमुख मनोज परब यांनी काल (शनिवारी, दि.६) काँग्रेस नेत्यांना अंतिम निर्णय 'उद्या सकाळी' देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज (रविवार) दुपारपर्यंत काँग्रेस नेत्यांना रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने युतीचा 'सस्पेन्स' आणखी वाढला आहे.

सकाळ'चा शब्द गेला वाया

काल (शनिवारी) काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर मनोज परब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यांनी माध्यमांना सांगितले होते की, काँग्रेसने त्यांच्यासमोर युतीचा नवीन प्रस्ताव ठेवला आहे आणि ते आज रात्री (शनिवारी रात्री) पक्षाच्या सदस्यांशी चर्चा करतील. या चर्चेनंतर 'उद्या सकाळी' युतीबाबत अंतिम निर्णय घेऊन काँग्रेस नेत्यांना कळवतील.

यानुसार, रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीने युतीचा निर्णय घेतल्यास ते सकाळी पुन्हा काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार होते. मात्र, काँग्रेस नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आज दुपारपर्यंत परब यांच्या उत्तराची प्रतीक्षा केली, परंतु रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

युतीचे घोडे नेमके कुठे अडले?

या सततच्या विलंबामागे रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीची कठोर भूमिका असल्याचे दिसते. मनोज परब यांनी पक्षांतर केलेल्या आमदारांना युतीत सामील करून घेण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच, काँग्रेसने युतीची चर्चा सुरू असतानाच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्याने रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीनेही आपल्या उमेदवारांची दुसरी यादी घोषित केली होती.

काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे प्रमुख मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांच्यासोबत शनिवारी आणि भेट घेतली होती. गोवा फॉरवर्ड पार्टीचे (GFP) नेते विजय सरदेसाई यांनी यापूर्वीच काँग्रेससोबत युतीत राहण्याची घोषणा करत 'तू-तू-मैं-मैं' भूमिकेवर टीका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT