Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: काँग्रेस,‘आप’मधील दरी वाढणार! निरीक्षकांचा अंदाज; ‘झेडपी’त दोन्ही पक्ष स्वबळाच्या तयारीत

Goa Political News: सध्‍या आम्‍ही गोव्‍यातील चाळीसही मतदारसंघात आमचा पक्ष मजबूत करण्‍याच्‍या तयारीत आहोत. विधानसभा निवडणुकीला अजून दीड वर्ष बाकी आहे.

Sameer Panditrao

मडगाव: भाजपला हरवायचे असेल तर सर्व भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्‍याची गरज काँग्रेस आणि आप या दोन्‍ही पक्षांचे स्‍थानिक नेते व्‍यक्‍त करत असले तरी प्रत्‍यक्षात या दोन पक्षांतील दरी आणखी मोठी होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.

काही महिन्‍यांनी येऊ घातलेल्‍या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत याचे परिणाम दिसून येतील, अशी शक्‍यता राजकीय निरीक्षकांकडून व्‍यक्‍त केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर केलेली ‘इंडिया’ आघाडी संपुष्‍टात आल्‍याची घोषणा ‘आप’च्‍या केंद्रीय नेत्‍यांनी केली असताना आम्‍हाला यासंदर्भात केंद्रीय समितीकडून कुठलेही निर्देश मिळालेले नाहीत, असे बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्‍हिएगस यांनी सांगितले असले तरी ‘आप’चे गोवा अध्‍यक्ष अमित पालेकर यांनी केंद्रीय नेत्‍यांच्‍या भावनेशी आम्‍ही सहमत आहोत, अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली.

सध्‍या आम्‍ही गोव्‍यातील चाळीसही मतदारसंघात आमचा पक्ष मजबूत करण्‍याच्‍या तयारीत आहोत. विधानसभा निवडणुकीला अजून दीड वर्ष बाकी आहे. विधानसभा निवडणुकीत युती करायची की नाही, हा निर्णय वेळ येईल त्‍यावेळी केंद्रीय नेतृत्‍व घेईल, असे पालेकर यांनी सांगितले.

दरम्‍यान, येत्‍या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसने अन्‍य कुठल्‍याही पक्षाशी युती न करता स्‍वत:च्‍या बळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्‍यांकडून होऊ लागली आहे. बाणावलीतून ही मागणी अधिक नेटाने हाेते.

मागच्‍या जिल्‍हा पंचायत पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाणावलीत आपला उमेदवार उभा न करता आम आदमी पक्षाच्‍या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्‍यावेळीही स्‍थानिक गटाकडून विरोध झाला होता. ‘आप’शी त्‍या पोटनिवडणुकीत केलेली युती एक घोडचूक होती, अशी प्रतिक्रिया बाणावलीच्‍या काँग्रेस गटाने व्‍यक्‍त केली आहे.

कॉंग्रेसकडून युती टाळण्याचा प्रयत्न!

वेळ्‍ळीतही स्‍थानिक काँग्रेस नेते ‘आप’शी काँग्रेसने युती करू नये, अशी मागणी करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना अमित पालेकर म्‍हणाले, केंद्रात असो किंवा गोव्‍यात काँग्रेस आणि ‘आप’ यांच्‍यात युती होऊ नये यासाठी काँग्रेसकडूनच प्रयत्‍न केला जात आहे, हे वारंवार दिसून आले आहे. ‘आप’पेक्षा काँग्रेसलाच ही युती होऊ नये असे वाटते. त्‍यामुळे युती तुटल्‍यास आम्‍हाला कोणी दोष देऊ नये, अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cabinet Decision: स्थानिकांना 1000 सरकारी नोकऱ्या मिळणार, गोव्यात युनिटी मॉलसह 7 मोठे प्रकल्प उभे राहणार; मंत्रिमंडळात CM सावंतांचा मोठा निर्णय

Goa Politics: खरी कुजबुज, तवडकर- गावडे वाद कशासाठी?

Omkar Elephant: 'ओंकार' शेतमळ्यांच्या प्रेमात, तांबाेसेत वाढला मुक्काम; शेतकरी मात्र हैराण

Goa Murder Case: गोव्यात 64 वर्षीय वृद्ध महिलेचा चाकूने गळा कापला; आसामच्या 21 वर्षीय तरुणाला अटक

Guirim Road Issue: गिरीतून जात आहात...तर सावधान! महामार्गावर लोखंडी सळ्या व खड्डे; दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT