पणजी: राज्यात सध्या कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन राजकीय घमासान पाहायला मिळत आहे. यातच आता, या प्रकरणावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात एजंटांना अटक करण्यात असली तरी राजकीय सहभागाशिवाय हे शक्य नसल्याचे पार्सेकर म्हणाले.
पार्सेकर म्हणाले की, "पोलिस विभागाने योग्य तपासाशिवाय कोणालाही क्लीन चीट देऊ नये. एजंटांना अटक करण्यात आली असली तरी राजकीय सहभागाशिवाय हे शक्य झालेले नाही. माझ्या कार्यकाळात असे काही प्रकरण सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडले असते. हा घोटाळा म्हणजे तरुण पिढीवर होणारा अन्याय आहे."
दरम्यान, या प्रकरणावरुन विरोधकांनी सावंत सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. रोज नव-नवे खुलासे होत आहेत. सावंत सरकारमधील मंत्री, आमदार यांचा या प्रकरणात सहभाग असल्याची घणाघाती टीका विरोधकांकडून होत आहे.
तसेच, या प्रकरणाची तात्काळ न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणीही जोर धरु लागली आहे. जोपर्यंत न्यायालयीन चौकशी होत नाही तोपर्यंत सावंत सरकारला स्वस्त बसू देणार नाही अशी खूणगाठ विरोधकांनी बांधली आहे. मात्र या सगळ्यात पार्सेकर यांची ही रोखठोक प्रतिक्रिया सावंत सरकारसाठी रुचणारी नाही.
दुसरीकडे, सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गोमंतकीय तरुणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या श्रुती प्रभुगावकरचे भाजपशी असलेले कनेक्शन उघड झाल्यानंतर राज्यात एकच हलकल्लोळ माजला. प्रभुगावकरच्या भाजप कनेक्शनने सावंत सरकारला बॅकफूटवर आणले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.