BJP Protest  Dainik Gomantak
गोवा

Carlos Ferreira: आक्षेपार्ह व्हिडिओमुळे फेरेरांचं काय होणार? भाजप आक्रमक; केली 'ही' मोठी मागणी

Sextortion Case: राज्यात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन आक्रमक असलेले काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

Manish Jadhav

पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन आक्रमक असलेले काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. फेरेरा यांनी दिलेल्या सेक्स्टॉर्शनच्या तक्रारीनंतर राजकीय वादंग माजला.

भाजप समर्थकांनी मंगळवारी (10 डिसेंबर) पणजीत फेरेरा यांचा निषेध करत काँग्रेस भवनासमोर निदर्शने केली. फेरेरा यांना तात्काळ आमदारपदावरुन हटवण्यात यावे, अशी मागणी यावेळी भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली.

रविवारी (8 डिसेंबर) नास्नोळा येथे माजी आमदार ग्लेन टिकलो यांच्या नेतृत्वाखाली भाजप मंडळाने फेरेरा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

आक्षेपार्ह व्हिडिओवरुन खळबळ

दरम्यान, राज्यात सध्या एका आक्षेपार्ह व्हिडिओवरुन खळबळ माजली आहे. हा व्हिडिओ काँग्रेसचे विद्यमान आमदार फेरेरा यांचा असून, त्यांनी हळदोणा गावाची नाच्चकी केली आहे, असा दावा करण्यात आला. भाजप पदाधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीची मागणी होत आहे.

'सेक्स्टॉर्शन'प्रकरण

गेल्या आठवड्यात 'सेक्स्टॉर्शन'प्रकरणी ओडिशाच्या एकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. विद्यमान आमदाराचा अश्लिल व्हिडिओ मोर्फ करुन सोशल मिडियावर व्हायरल केल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ओडिशाच्या कुकेश राऊता या 25 वर्षीय तरुणाला अटक केली.

कुकेशाने हा अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्याची धमकी देवून विद्यमान आमदाराकडे पाच कोटींची मागणी केली होती. कुकेशाने पोलिस तपासात आतापर्यंत पाच लाखांची खंडणी वसूल केल्याचीही कबुली दिली.

क्राईम ब्रँच पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका आमदाराने तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी असे म्‍हटले होते की, अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरुन (Mobile) व्हिडिओ कॉल केला व त्यांच्या नकळत तो रिकॉर्ड केला होता. त्यानंतर त्या व्यक्तीने आपली छायाचित्रे एका महिलेसोबत जोडून त्याचा अश्‍‍लील व्हिडिओ मला पाठविला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

Goa Politics: खरी कुजबुज; भाजप खासदार काँग्रेस नेते?

SCROLL FOR NEXT