Congress Leader Amarnath Panajikar Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: ''डोळ्यावरची पट्टी काढून सर्वकाही खुल्लम खुल्ला करण्याचे संकेत''; काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकरांचा हल्लाबोल

Congress Leader Amarnath Panajikar Criticized Sawant Government: काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी सावंत सरकारवर हल्लाबोल केला. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चौकशी चालू असलेले मंत्री सरन्यायाधीशांच्या स्वागत करतात हे खूपच दुर्दैवी आहे.

Manish Jadhav

Goa Politics Congress Leader Amarnath Panajikar Criticized Sawant Government

Goa News: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड काल (19 ऑक्टोबर) गोवा दौऱ्यावर होते. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत सरन्यायाधीशांनी मेरशी येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या संकुलाचे उद्धाटन केले. त्यानंतर त्यांनी गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्याबरोबर पुस्तक प्रकाशनाला हजेरी लावली. दरम्यान, काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी सावंत सरकारवर हल्लाबोल केला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चौकशी चालू असलेले मंत्री सरन्यायाधीशांच्या स्वागत करतात हे खूपच दुर्दैवी असल्याचे पणजीकर म्हणाले.

पणजीकर म्हणाले की, ''भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चौकशी चालू असलेले मंत्री सरन्यायाधीशांचे स्वागत करतात. दुसऱ्या दिवशी, भारताचे सरन्यायाधीश पक्षांतर करणारे मंत्री आणि आमदार यांच्यासोबत कार्यक्रमात उपस्थित राहतात आणि गोव्यात सुरु असलेल्या विकासामुळे ते प्रभावित झाल्याचे वक्तव्य करतात. नेमक्या त्याचदिवशी, उच्च न्यायालय गोव्यातील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमणाची स्वतःहून दखल घेत सरकारला नोटीस जारी करते. एकंदर हा प्रकार पाहता डोळ्यावरची पट्टी काढून सर्वकाही खुल्लम खुल्ला करण्याचेच हे संकेत आहेत.''

जागतिक आर्थिक केंद्र बनण्याची क्षमता

गोव्यात निर्माण झालेल्या पायाभूत सुविधा पाहता लवादांच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील आर्थिक केंद्र बनण्याची क्षमता या राज्यात आहे. गोव्याच्या विकासाने मला प्रभावित केले. हे छोटे राज्य प्रगतशील विकासाबरोबर जलद आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या मार्गावर आहे, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fianance Scam: गोव्यात आजवरचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा; गुंतवणुकीच्या नावाखाली 50 जणांना 130 कोटींचा गंडा

Mayem Fire Incident: वायंगिणी-मयेत आगीचा तांडव! 30 लाख रुपयांचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Cash For Job: आमच्यावर पोलिसांमार्फत पाळत! सरदेसाई, पालेकरांचा सनसनाटी आरोप

Rashi Bhavishya 25 November 2024: उद्योजकांसाठी आजचा दिवस खास, मिळणार मोठी डील... तुमच्या राशीत दडलंय काय?

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

SCROLL FOR NEXT