Goa Politics Chief Minister Dr Pramod Sawant's It is reported that MLAs and Ministers are unhappy with administration Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: मुख्यमंत्री सावंतांच्या कारभारावर आमदार, मंत्र्यांची नाराजी; विश्वजीत राणेंकडून आमदारांचे वशीकरण सुरु

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोव्यात भाजप गेली 12 वर्षे सलग सत्तेत आहे. आधी मनोहर पर्रीकर त्यानंतर लक्ष्मीकांत पार्सेकर आणि त्यानंतर 2019 पासून डॉ. प्रमोद सावंत राज्याचा राज्यकारभार हाकत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून मंत्री आमदारांमध्ये सावंतांविरोधात मोठ्या प्रमाणात खदखद सुरु झाली आहे. ही खदखद सुरु होण्यामागे मुख्य कारणे आहेत ती म्हणजे आमदार, मंत्र्यांची रखडून पडत असलेले कामे आणि विकास कामांचे प्रस्ताव.

अगदी लहान लहान कामेही मुख्यमंत्र्यांकडे महिनोन महिने पडून राहतात. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला ना वरिष्ठ अधिकारी ना कनिष्ठ अधिकारी, कोणीही मान देत नाहीत असे आमदार, मंत्री आता खुलेआम बोलून दाखवत आहेत.

अगदी आमदार मंत्र्यांनी सांगितलेल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि त्याही मुख्यमंत्र्यांकडील खात्यांमधील बदल्या होत नाहीत अशा तक्रारी आहेत. ज्याप्रमाणे मनोहर पर्रीकरांचा प्रशासनावर ताबा होता तसा ताबा वा वचप निर्माण करण्यास मुख्यमंत्री सपशेल अपयशी ठरल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे काही आमदार, मंत्र्यांनी गोमन्तककडे बोलताना सांगितले.

मुख्यमंत्र्यांची मंत्री गावडेंना वाचविण्याची भूमिका, भाजपचेच आमदार मंत्री नाराज

कला अकादमीवरुन मंत्री गोविंद गावडेंवर राज्यभरातून टीकेची झोड उठली असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यांना वाचवण्याची भूमिका घेत आहेत यावर खुद्द भाजपमधील आमदार मंत्र्यांनीच नाराजी व्यक्त केली आहे. कला अकादमीवरुन सरकारवर होणारे कथित भ्रष्टाचाराच्या (Corruption) गंभीर आरोपांमुळे भाजप सरकाराच्या विश्वासहार्तेला गंभीर तडे गेले आहेत.

मंत्री गावडेंवर फक्त कला अकादमीवरुन नाही तर राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेच्या आयोजनावरुनही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप विरोधकांनी केलेत. त्याखेरीज काही महिन्यांपूर्वी मंत्री गोविंद गावडेंचा आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांच्याशी अगदी खालच्या पातळीवरील संभाषणाचा ऑडीयो व्हायरल झाला होता.

मंत्री गावडेंविरोधात एवढी प्रकरणे असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यांच्या बाचावाची भूमिका घेत असल्याने यात आता आमदार मंत्र्यांनाही वेगळा वास यायला सुरु झाल्याची चर्चा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या गाभा समितीतील अनेक सदस्यही गावडेंचे मंत्रीपद काढावे या आग्रही भूमिकेचे आहेत.

मुख्यमंत्र्यांविरोधात खतखत आणि मंत्री विश्वजित यांच्याकडून आमदारांचे वशीकरण सुरू

मंत्री विश्वजीत राणे (Vishwajit Rane) हे मुख्यमंत्री डॉ. सावंतांचे कट्टर विरोधक. दोघांमध्ये सुरु असलेली अंतर्गत कुरघोडी ही आता सर्वसामान्यांनाही कळून चुकली आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर आमदार मंत्र्यांमध्ये सुरु झालेली तीव्र नाराजी मंत्री राणे एनकॅश करण्याच्या पूर्ण प्रयत्नांत आहेत.

मंत्री राणे यांच्याकडे टीसीपी, आरोग्य, वन, नगरविकास अशी महत्वाची खाती आहेत. या खात्यांचा उपयोग मंत्री राणे आमदारांचे आपल्याबाजूने वशीकरण करण्यासाठी करताना दिसत आहेत. खासकरुन जे आमदार आपल्याबाजूने येऊ शकतात त्यांना मंत्री राणेंनी टीसीपीत खुली मोकळीक दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या गोटातील आमदार मंत्र्यांकडे मंत्री विश्वजीतनी थोडे अंतर बाळगले असल्याची चर्चा सुरु आहे.

त्याखेरीज मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेच्या नावाने आपल्याभोवती जमवलेला अवाजवी लवाजमा, प्रत्येक कार्यक्रमाची इव्हेंटबाजी करुन त्यावर सुरु असलेली करोडो रुपयांची उधळपट्टी, मुख्यमंत्री कार्यालयातून हाताळले जाणारे काही विशय यामुळेही खुद्द भाजप आमदार मंत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आता चर्चा सुरु झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT