‘काहीजण मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पाहू लागले आहेत. मात्र, त्यांची स्थिती ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’प्रमाणे आहे. त्यांची स्वप्ने कधीही पूर्ण होणार नाहीत, असे आमदार दिगंबर कामत म्हणाले.
'कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. भाजपला विजयापासून कोणी रोखू शकणार नाही’, अशा शब्दात मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांच्यावर नामोल्लेख टाळून जोरदार निशाणा साधला.
दरम्यान, मडगाव येथे मंगळवारी भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मतदार अभिवादन कार्यक्रमात कामत बोलत होते. या कार्यक्रमात 50 हून अधिक मतदारांचा सत्कार करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार निलेश काब्राल, उल्हास तुयेकर, संकल्प आमोणकर, दाजी साळकर, प्रदेश सरचिटणीस नरेंद्र सावईकर, दामोदर नाईक, सर्वानंद भगत, तुळशीदास नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी भाजप नेत्यांनी जोशपूर्ण भाषणे केली.
कामत पुढे म्हणाले की, डॉ. प्रमोद सावंत पुन्हा मुख्यमंत्री होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोव्यावर बारीक लक्ष आहे. 2027 मध्ये डॉ. सावंत यांच्याच नेतृत्वाखाली गोव्यात निवडणुका होतील.
‘भाजपची (BJP) घोडदौड सुरु आहे. विरोधकांनी संविधान बदलाच्या कहाण्या रचल्या; परंतु जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत, तोपर्यंत भाजप संविधान बदलणार नाही, हे मतदारांनी लक्षात ठेवावे. खरे तर, काँग्रेसनेच आठवेळा संविधानात बदल केला. विकास हा निवडणुकीत मुद्दा होऊ शकत नाही, हे आम्ही लोकसभा निवडणुकीतून शिकलो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.