BJP X MGP Politics Dainik Gomantak
गोवा

BJP MGP alliance Goa: भाजप - मगोची युती कायम राहणार? ढवळीकर बंधुंना बी. एल. संतोष यांनी दिल्लीत काय आश्वासन दिले?

Goa politics: मतदारसंघनिहाय सर्व्हेक्षण केल्यानंतर जागा वाटपाबाबत निर्णय घेतला जाणार, दिपक ढवळीकरांचे स्पष्टीकरण.

Pramod Yadav

पणजी: भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात गेल्या काही दिवसांपासून धूसफूस सुरु आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यानंतर मंत्री गोविंद गावडे यांनी युतीवर केलेल्या वक्तव्यामुळे अस्वस्थ झालेल्या ढवळीकर बंधुंनी थेट दिल्ली गाठून भाजपचे संघटन प्रमुख बी. एल. संतोष यांची भेट घेतली. संतोष यांनी ढवळीकरांना युतीबाबत ठोस आश्वासन दिल्याची माहिती समोर येत आहे.

'प्रियोळ मतदारसंघ भाजपकडे राहणार, मान्य नसेल तर त्यांनी (मगो) निघावं', असं वक्तव्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. यानंतर 'भाजपला मगोसोबत युतीची गरज नाही', असे वक्तव्य मंत्री गावडेंनी केल्याने युतीतील वाद चव्हाट्यावर आला होता. भाजप नेत्यांच्या वक्तव्यांवरुन अस्वस्थ झालेल्या ढवळीकर बंधुंनी थेट दिल्ली गाठून भाजपचे संघटन प्रमुख बी. एल. संतोष यांची भेट घेतली. २०२७ मध्ये देखील भाजप - मगोची युती राहणार, असे आश्वासन बी. एल. संतोष यांनी दिल्याची माहिती मगो अध्यक्ष दिपक ढवळीकरांनी दिली आहे.

मगोचा प्रियोळ मतदारसंघावर डोळा आहे अशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची दिशाभूल करण्यात आल्याने त्यांनी युतीबाबत वक्तव्य केल्याचे मगोचे अध्यक्ष दिपक ढवळीकर म्हणाले. या वक्तव्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. २०२७ मध्ये देखील भाजप - मगो युती कायम राहणार आहे. मतदारसंघनिहाय सर्व्हेक्षण केल्यानंतर जागा वाटपाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा संतोष यांच्याशी झाल्याची माहिती अध्यक्ष दिपक ढवळीकरांनी दिली आहे.

युतीबाबत उलटसुलट चर्चा होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी युती राहणार नाही, असे कुठेच वक्तव्य केले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. दरम्यान, मंत्री गावडे यांनी मात्र ढवळीकर बंधुंवर सडकून टीका करत त्यांनी गोव्यातील बहुजन लोकांना संपविण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला. तसेच, दोघांना राजकारणात घेऊन येणे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे गावडे म्हणाले. यामुळे भाजप - युतीतील वाद वाढल्याचे दिसून आले.

दुसरीकडे मांद्रेचे मगो आमदार जीत आरोलकर मात्र पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्षाच्या सदस्यपदाची साडेतीन वर्षे पूर्ण झाल्याने आपण अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी पात्र असल्याचा दावा आरोलकरांनी केला. दरम्यान, पक्षाच्या घटनेनुसार पक्ष सदस्यत्व घेऊन सहा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय अध्यक्षपदी नियुक्ती करता येत नाही, असा निर्वाळा विद्यमान अध्यक्ष दिपक ढवळीकरांनी दिला होता. गोविंद गावडेंनी हिम्मत असेल जीत आरोलकरांना अध्यक्ष करा, असे आव्हान ढवळीकरांना केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT