President Vijay Sardesai (Goa Politics) Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: कोणतेही 'बुलेट प्रूफिंग' भाजपला जनतेपासून वाचवू शकणार नाही; आमदार सरदेसाई

राज्याची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना बिनगरजेचे निर्णय (Goa Politics)

सुशांत कुंकळयेकर

Goa Politics: दोन टोयोटा फॉर्च्युनर वाहनांना व्हीआयपींच्या वापरासाठी पूर्ण बुलेटप्रूफमध्ये (Bulletproof Vehicles) रुपांतरित करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करतना, गोवा फॉरवर्डचे (Goa Forward Party) अध्यक्ष विजय सरदेसाई (President Vijay Sardessai) यांनी म्हटले आहे की, भाजप सरकारने अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून ठेवली आहे, मात्र सरकारातील मंत्री व्हीआयपी सेवांवर पैसे खर्च (Expenses on VIP's Services) करत आहेत. ‘‘स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केल्या सारखे मंत्री निर्णय घेत आहेत. कर्ज घेवून या सर्व सेवा व्हीआयपींना दिल्या जाणार आहे.‘ असे सरदेसाई म्हणाले.

नोकऱ्या गेल्याने हजारो गोमंतकीय युवकांचे इतर देशांत स्थलांतर

“गेल्या दोन वर्षांत हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. रोजगार नसल्याने आमचे युवक इतर देशांमध्ये स्थलांतर करत आहेत, त्यांना स्थलांतर करण्यापासून रोखण्याऐवजी आणि रोजगार निर्माण करण्याऐवजी, भाजपा सरकार जनतेचा पैसा गरज नसलेल्या कार्यक्रमांवर खर्च करत आहे.’’ अशी खंत सरदेसाई यांनी व्यक्त केली.

अर्थव्यवस्था कोलमडलेली तरीसुद्धा भाजप सरकारची उधळपट्टी

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि त्यांचे मंत्रिमंडळ कोणत्या जगात राहतात हेच कळत नाही? अलीकडच्या काळात, गोमंतिकयांना अनेक त्रास सहन करावे लागले असताना भाजप सरकार लोकांना अजून खाईत ढकलत आहे.” असे सरदेसाई पुढे म्हणाले.

“सध्या नोकर्‍या नाहीत ना कोणते व्यावसायिक उपक्रम सुरु होण्याच्या मार्गावर. सद्यपरिस्थितीत जिथे अर्थव्यवस्था कोलमडली आहे, कोणीही व्यवसाय सुरू करण्याचा धाडस करू पाहत नाही. कारण प्रत्येक उद्योग उध्वस्त झाला आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था तरीसुद्धा भाजप ज्या प्रकारे जनतेचा पैसा उधळत आहे, जसे त्यांच्या मालकीचा पैसा आहे.

राज्याच्या तियात्र आणि नाटक कलाकारांनाही मदत देण्यात सरकार अपयशी

कोणतेही बुलेट प्रूफिंग भाजपला गोव्याच्या जनतेच्या रोषापासून वाचवू शकणार नाही.’’ असे फातोर्डाचे आमदार सरदेसाई म्हणाले. त्यांच्या मते, भाजप सरकार योग्य वेळी पूरग्रस्तांना मदत करण्यात अपयशी ठरले आणि थेटर्स बंद पडल्यामुळे राज्याच्या तियात्र आणि नाटक कलाकारांनाही मदतीचा हात देण्यात अपयशी ठरले.

"भाजप सरकारचे प्राधान्य सामान्य लोकांना मदत करणे नव्हे, तर व्हीआयपींना मदत देणे आहे." आजच्या मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय या गोष्टी सिद्ध करतो. ” असे ते म्हणाले. ‘‘भाजप सरकार गोमंतिकायांच्या हितासाठी काम करत नाही आणि त्यामुळे जागरूक लोक त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवतील.’’ असे सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT