Goa Politics : आम आदमी पार्टी  Dainik Gomantak
गोवा

‘आप’च्‍या तीर्थयात्रा हमीलाही

गोमंतकीय जनतेकडून प्रतिसाद

दैनिक गोमन्तक

पणजी : (Goa Politics) आम आदमी पक्षाचे (AAP) नेते तथा दिल्लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejariwal) यांच्या ‘तीर्थयात्रा’ घोषणेलाही राज्‍यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. केजरीवाल सरकार तीर्थयात्रा हमीद्वारे लोकांच्या आध्यात्मिक आकांक्षा पूर्ण करत आहे, असे ‘आप’चे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी सांगितले.

दिल्लीत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्‍यांनी क्रांती घडवून आणली. मोफत वीज आणि 24 तास पाणी देण्‍याचे आश्वासन पूर्ण केले, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

गेल्या काही वर्षांपासून अशाच प्रकारची योजना दिल्लीत सुरू आहे. या अंतर्गत लोकांना तीर्थक्षेत्र निवडण्याचा पर्याय देण्यात आला. वाहतूक, निवास आणि भोजनाचा खर्च केला जातो. लोक एसी ट्रेनने प्रवास करतात आणि एसी रूममध्ये राहतात. गोव्यात ‘आप’ची सत्ता आल्यास आम्ही या यादीत आणखी काही ठिकाणांचा समावेश करू, असे ‘आप’चे सरचिटणीस (ओबीसी विंग) उपेंद्र गावकर म्‍हणाले.

निवडणूक जवळ आली की काही राजकारणी आपल्या मर्जीतील लोकांसाठी शिर्डी, पंढरपूर यात्रा पुरस्कृत करतात. या यात्रांवर केलेला खर्च नंतर निवडून आल्यावर भ्रष्टाचार करून वसूल करतात. तसेच या गैरकृत्‍यांतून कोट्यवधी रुपये कमावतात. पण केजरीवाल यांनी तीर्थयात्रांचे पावित्र्य जपून सर्वधर्मीयांसाठी तयार केली योजना कौतुकास्पद आहे, असेही गावकर म्‍हणाले. सध्या 2.90 लाख कुटुंबांनी म्हणजेच गोव्याच्या लोकसंख्येच्या 70 ते 75 टक्के लोकांनी वीज हमी कार्यक्रमाअंतर्गत तर 1.12 लाख तरुणांनी रोजगार हमी कार्यक्रमाअंतर्गत नोंदणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT