गोव्यात आज सर्वत्र 'नरकासुरांचा राज'

डिचोली शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मिळून नरकासुरांच्या शेकडो प्रतिमा तयार केल्या असून, पावसाने कृपा केल्यास उद्या रात्रभर सर्वत्र जल्लोषी वातावरणात नरकासुरांच्या मिरवणुका होण्याचे संकेत मिळत आहेत.
There will be procession of Narakasura in Bicholim
There will be procession of Narakasura in Bicholim Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: दिवाळी (Diwali) सणावर पावसाचे सावट असले, तरी सध्या डिचोलीत दिवाळीचे उत्साही वातावरण पसरले असून, आज (बुधवारी) डिचोलीत सर्वत्र रात्रभर 'नरकासुरांचे राज' (Narkasur) असणार आहे. डिचोली (Bicholim) शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मिळून नरकासुरांच्या शेकडो प्रतिमा तयार केल्या असून, पावसाने कृपा केल्यास उद्या रात्रभर सर्वत्र जल्लोषी वातावरणात नरकासुरांच्या मिरवणुका होण्याचे संकेत मिळत आहेत. विविध मंडळांनी मिरवणुकांची तयारीही केली आहे. आयडीसी, भायलीपेठ आदी काही भागात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान,आज रात्री पुन्हा पावसाळी वातावरण तयार होताना विजांचा कडकडाट आणि गडगडाट सुरु होता. तरीदेखील सर्वत्र नरकासुरांची अंतिम टप्प्यातील कामे जोरात सुरु होती. नरकासुर भिजणार नाहीत. याची प्रत्येक मंडळांनी काळजी घेतली आहे.

There will be procession of Narakasura in Bicholim
गोव्याचा प्रसिद्ध नरकासुर पूर्णत्वाकडे...; पाहा व्हिडिओ

नरकासुर नटले

'कोविड' महामारीमुळे गेल्या वर्षी नरकासुर स्पर्धा आणि मिरवणुकांवर निर्बंध आले होते. त्यामुळे गेल्यावर्षी नरकासुरांचा आकडा कमी होता. सध्या 'कोविड'ची परिस्थिती बरीच सुधारली असल्याने यंदा गावोगावी शेकडो नरकासुर नटले आहेत. बच्चे कंपनींसाठी बाजारात उपलब्ध असलेले मुखवटे आणि रेडिमेड नरकासुरांनाही यंदा मागणी वाढली आहे. कोविडची परिस्थिती नियंत्रणात असली, तरीदेखील क्वचित अपवाद सोडल्यास यंदा भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे भव्य नरकासुर प्रतिमा करण्याचे बहूतेक मंडळांनी टाळले आहे. गावोगावी नरकासुर मिरवणुकांची धूम असणार आहे. मंगळवारप्रमाणे उद्या पावसाने कृपा केली, तर बुधवारी सायंकाळी ते गुरुवारी पहाटेपर्यंत सर्वत्र संगीताच्या तालावर मिरवणुकांची जल्लोष उडण्याची शक्यता आहे.

There will be procession of Narakasura in Bicholim
गोव्यात फातोर्डा युवा शक्तीने नरकासुर वध स्पर्धेचे केले आयोजन

पावसाची कृपा असू दे

हवामान खात्याचा अंदाज आणि कालपर्यंत सलग दोन दिवस पडलेला पाऊस यामुळे दिवाळी सणावर पावसाचे सावट असल्याचे संकेत आहेत. सलग दोन दिवस बरसल्यानंतर आज सायंकाळी उशिरापर्यंत पर्जन्यवृष्टी झालेली नाही. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. उद्याही पावसाने कृपा करावी. असेच प्रत्येकाला वाटत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com