Amit Palekar Amit Patkar debate Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: "वेळ आणि जागा ठरवा आम्ही येतो",आप-काँग्रेस भिडले; पालेकर-पाटकरांचा Face-Off लवकरच?

Amit Palekar AAP Goa: आप नेते अमित पालेकर यांनी तात्काळ पाटकर यांचे आव्हान स्वीकारत त्यांना थेट 'चर्चा' करण्याची तयारी दर्शवली आहे

Akshata Chhatre

पणजी: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या गोवा दौऱ्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी भाजपशी साटेलोटे असल्याचा आणि 'मत फोडण्यासाठी' गोव्यात आल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर, आप नेते अमित पालेकर यांनी तात्काळ पाटकर यांचे आव्हान स्वीकारत त्यांना थेट 'चर्चा' करण्याची तयारी दर्शवली आहे.

आपचे 'ट्विटर'वरून थेट प्रत्युत्तर

अमित पाटकर यांनी केजरीवाल यांना राहिलेल्या दोन दिवसांत 'हिम्मत असेल तर समोर येऊन चर्चा' करावी, असे आव्हान दिले होते. याला उत्तर देताना आप नेते अमित पालेकर यांनी सोशल मीडियाचा आधार घेत तत्काळ प्रत्युत्तर दिलेय.

आप नेते अमित पालेकर म्हणाले, "होय, अमित पाटकर तुम्ही वेळ आणि जागा ठरवा आणि आपण 'चर्चा' करूया. मी तयार आहे! उद्या कोणत्याही वेळी आणि तुमच्या आवडीच्या ठिकाणी." यामुळे भाजप-काँग्रेसमध्ये साटेलोटे असल्याच्या आरोपावरून सुरू झालेला शाब्दिक संघर्ष आता थेट 'आमने-सामने' चर्चेच्या पातळीवर पोहोचला आहे.

पाटकर यांचा 'भाजप एजंट'चा गंभीर आरोप

यापूर्वी अमित पाटकर यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. डिचोली येथील सभेमध्ये केजरीवाल यांनी 'आप' सत्तेवर आल्यास मयेवासीयांना जमिनीचे हक्क देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर पाटकर यांनी केजरीवाल यांच्यावर 'तथ्यांचा आधार न घेता, अफवांवर विश्वास ठेऊन बोलत' असल्याचा आरोप केला होता.

पाटकर म्हणाले, "बेळगाव, सारमानससारख्या ठिकाणचे शेतकरी त्रस्त असताना आणि लाईराई देवीच्या विषयाचे भाजपने राजकारण केले असतानाही केजरीवाल या गंभीर विषयांवर मौन बाळगतात. यामुळे स्पष्ट होते की, भाजप सरकारनेच केजरीवालांना निवडणुकीत मत फोडण्यासाठी गोव्यात पाठवले आहे." या वादातून आता गोव्यातील भाजपविरोधी पक्षांमधील फूट उघड झाली असून, दोन्ही नेत्यांमधील होणाऱ्या संभाव्य चर्चेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'गोव्याच्या किनाऱ्यावर...' परदेशी सुंदरींचा मराठी गाण्यावर भन्नाट डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Goa Election 2027: 'मिशन गोवा'साठी भाजपचा मास्टर प्लॅन तयार! राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत रणनीतीवर शिक्कामोर्तब; विजयाची हॅट्ट्रिकसाठी 'जनसंपर्क पॅटर्न'

"गोवा म्हणजे जणू माझं घरच!", ऑस्ट्रेलियाचा 'हा' दिग्गज अष्टपैलू गोव्याच्या प्रेमात; जुन्या मित्रांच्या भेटीसाठी बेस्ट डेस्टिनेशन

Betim: सफर गोव्याची! डोंगर आणि नदी यांच्यामधील दुवा; निसर्गसंपन्न 'बेती'

पाकिस्ताननं 'B' टीमला हरवलं, पण जल्लोष वर्ल्ड कप जिंकल्यासारखा! शाहबाज शरीफ यांच्या 'प्राइड'वर आकाश चोप्राचा 'मास्टर स्ट्रोक'

SCROLL FOR NEXT