Goa ZP Elections Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'आमच्या उमेदवारांची चिंता तुम्हाला का?' सत्ताधारी भाजपला आपने डिवचले

Goa AAP BJP clash: भाजपला काही महत्त्वाच्या जागांवर पराभवाची भीती वाटत असल्यानेच ते असे प्रश्न विचारत असल्याचा आरोप केला आहे

Akshata Chhatre

Goa ZP election news: गोवा विधानसभेच्या आगामी २० डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी आम आदमी पार्टी (AAP) ने आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर, सत्ताधारी भाजप पक्षाने 'आप'च्या उमेदवारांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर 'आप'ने भाजपवर प्रतिहल्ला चढवत, भाजपला काही महत्त्वाच्या जागांवर पराभवाची भीती वाटत असल्यानेच ते असे प्रश्न विचारत असल्याचा आरोप केला आहे.

भाजप 'आप'च्या उमेदवारांवर प्रश्न का विचारतेय?

गोव्यातील 'आप'चे अध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी भाजपच्या या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. 'आप'च्या उमेदवारांची निवड हा त्यांचा अंतर्गत विषय असताना, भाजप त्यात लक्ष घालून अनावश्यक प्रश्न का उपस्थित करतंय, असा सवाल पालेकर यांनी केला.

पालेकर यांनी थेट आरोप केला की, भाजपला आता काही प्रमुख मतदारसंघांतील जागा गमवाव्या लागतील अशी भीती वाटू लागलीये, त्यामुळेच भयभीत होऊन भाजप 'आप'च्या उमेदवारांच्या निवडीवर प्रश्न विचारून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतंय. 'आप'ने चिंबल, सांताक्रुझ आणि ताळगाव या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पालेकर पत्रकारांशी बोलत होते.

चिंबलमध्ये पाणी आणि कचरा समस्यांवर टीकास्त्र

ॲड. पालेकर यांनी विशेषतः चिंबल मतदारसंघाचा उल्लेख करत, येथील स्थानिक आमदारावर जोरदार टीका केली. पालेकर म्हणाले की, चिंबलमध्ये पाण्याचा तीव्र तुटवडा आणि कचऱ्याची वाढती समस्या हे प्रमुख प्रश्न आहेत. मात्र, स्थानिक आमदार हे प्रश्न सोडविण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.

'आप'चे उमेदवार: 'आप'ने या तिन्ही जागांवर आपले उमेदवार उभे केले:

  • चिंबल: मारिया क्रिस्टलिना अंताओ

  • सांताक्रुझ: राजश्री चारी

  • ताळगाव: दुर्गा सिल्वा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT