पणजी: सर्वच पक्षांनी भंडारी समाजावर (Bhandari community) अन्याय केला आहे, त्यामुळे यावेळी आम्ही ‘आप’ (Aap) च्या समवेत आहोत. समाजातील प्रमुखांसोबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांनी चर्चा केली असून समाजाच्या उन्नतीसाठी ‘आप’ कायम प्रयत्नशील राहील, असे अश्वासन दिल्याची माहिती माजी मंत्री महादेव नाईक यांनी दिली. यावेळी भंडारी समाजातील अनेक नेत्यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला.
गोवा मुक्तीपासून भंडारी समाज साधनसुविधेपासून वंचित आहे. कोणत्याच सरकारने या समाजाची पर्वा केली नाही. मंत्री असतानाच्या काळात समाजातील लोकांसाठी काही योजना यशस्वीपणे राबवू शकलो, याचे समाधान आहे. तरीही त्यांतरच्या काळात वारंवार या समाजावर सरकारकडून अन्याय झाला आहे. तो दूर करून समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर ‘आप’शिवाय पर्याय नाही. त्यासाठीच भंडारी समाजातील नेते-कार्यकर्त्यांनी ‘आप’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती श्री. नाईक यांनी दिली. यावेळी बोलतांना भंडारी समाजाचे नेते सुदेश कळवटकर म्हणाले, भाजप सरकारने मागासवर्गीयांना काय दिले. काँग्रेसनेदेखील भंडारी समाजावर अन्याय केला आहे. यावेळी संपूर्ण राज्यातील जनतेला बदल हवा आहे, त्यामुळे भंडारी समाजाने ‘आप’च्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी गोरखनाथ केरकर यांनीही त्यांचे मत मांडताना ‘आप’ला समर्थन दिले.
काँग्रेसला धक्का
माजी सरपंच आणि काँग्रेसचे बाणावलीचे गट अध्यक्ष ट्रेवेर पिंटो यांनी आज आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत ‘आप’मध्ये प्रवेश केला. केजरीवाल यांनी त्यांना पक्षाची शाल घालून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ‘आप’नेते व्हेंजी व्हिएगस म्हणाले, कोणत्याच पक्षाने बाणावलीचा विकास केला नाही. विकासकामात सहकार्य मिळत नसल्यामुळेच पिंटो हे काँग्रेसला रामराम करून आपमध्ये आले आहेत. याप्रसंगी ट्रेवेर पिंटो यांनी बाणावलीमध्ये ‘आप’ने जे कार्य केले, त्यामुळे प्रवृत्त होऊन आपमध्ये दाखल झालो. यावेळी त्यांच्यासमवेत अल्बन रिबेलो उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.