Goa Police Campaign Dainik Gomantak
गोवा

Goa Police: गोवा पोलिस खात्यात 1140 पदे रिक्त! 42 उपअधीक्षक, 215 उपनिरीक्षक, 442 कॉन्स्टेबल्सचा समावेश

Goa Police Recruitment: विविध सरकारी खात्यांमध्ये भरती प्रक्रियेद्वारे शेकडो पदे भरण्यात आली असली तरी, पोलिस दलात अजूनही मनुष्यबळाचा तुटवडा आहे.

Sameer Panditrao

पणजी: अलीकडच्या वर्षांत विविध सरकारी खात्यांमध्ये भरती प्रक्रियेद्वारे शेकडो पदे भरण्यात आली असली तरी, पोलिस दलात अजूनही मनुष्यबळाचा तुटवडा आहे आणि मंजूर पदांपैकी जवळपास १४ टक्के पदे रिक्त आहेत. सध्या पोलिस खात्यात गोवा पोलिस व आयआरबी पोलिसांची एकूण ११४० पदे रिक्त आहेत. त्यामध्ये ४२ उपअधीक्षक, २१५ उपनिरीक्षक व ४४२ पोलिस कॉन्स्टेबल्स पदाचा समावेश आहे.

विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, गोवा पोलिसांची एकूण ७,७९१ कर्मचाऱ्यांची मंजूर संख्या असून, सध्याचे कार्यरत दल फक्त ६,८८७ आहे तर आयआरबी (गोवा सशस्त्र पोलिस) पोलिसांची एकूण २९९१ कर्मचाऱ्यांची संख्या मंजूर असून सध्या २७५५ पोलिस कार्यरत आहेत. त्यामुळे गोवा पोलिसांची ९०४ तर आयआरबीची २३६ पदे रिक्त आहेत. पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) पदांमधील थेट भरती आणि पदोन्नतीचा प्रश्न सुटलेला नाही परिणामी आतापर्यंत ४२ मंजूर उपअधीक्षकांच्या पदांपैकी फक्त २६ पदे भरली आहेत.

गोवा पोलिसांनी काही उपअधीक्षकांना बढती देण्याची विनंती करणारा प्रस्ताव सरकारला पाठवला आहे तथापि, सध्या पदोन्नती कोट्यात वळवलेल्या अतिरिक्त रिक्त पदे अजूनही रखडलेली आहेत; कारण सरकार ती थेट भरतीकडे परत आणावी की नाही याबद्दल अनिश्चित आहे. तपासासाठी जबाबदार असलेल्या महत्त्वाच्या पदांपैकी पोलिस उपनिरीक्षकांची (पीएसआय) कमतरता देखील समोर आली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, ५१४ च्या मंजूर संख्येच्या तुलनेत सध्याची संख्या ३३१ इतकीच आहे. महिला उपनिरीक्षकांमध्ये मंजूर १०० च्या तुलनेत फक्त ६८ जण काम करतात. एकूण २१५ उपनिरीक्षक पदे रिक्त आहेत.

सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) पदांची संख्या थोडी कमी आहे, ५६७ मंजूर पदांच्या तुलनेत ५५७ आणि हेड कॉन्स्टेबल १,२७८ च्या तुलनेत १,२६४ इतकी आहे. रिक्त असलेल्या पदांची ही कमतरता खालच्या पदांवरही दिसून येत आहे. पोलिस कॉन्स्टेबल त्यांच्या मंजूर संख्येपेक्षा कमी आहेत. सध्या, ३,८२९ च्या मंजूर संख्येच्या तुलनेत ३,४८७ कॉन्स्टेबल सेवा देत आहेत.

मुख्यालयात पोलिस तैनात

पोलिस खात्यात कॉन्स्टेबल्सची ४४२ पदे रिक्त असताना तसेच प्रत्येक पोलिस स्थानकात पोलिस कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असताना पोलिस मुख्यालयात सुरक्षेच्या नावाखाली पोलिस कॉन्स्टेबल्स तैनात करण्यात आले आहेत. या मुख्यालयात लिफ्ट असलेल्या पहिल्या व तळमजल्यावर पोलिस कर्मचारी ठेवण्यात आला आहे. मुख्यालयात पहिल्या मजल्यावर जाताना नोंदणीच्या ठिकाणी तसेच तपासणीसाठी हल्लीच पोलिसांची वर्णी लावण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT