Goa Police: Dainik Gomantak
गोवा

Goa Police: कळंगुट येथे दोघा मोबाईल चोरट्यांना अटक; दीड लाख रूपये किंमतीचे 8 मोबाईल फोन जप्त

आरोपी मूळचे पश्चिम बंगालचे

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Police: कळंगुट येथे मोबाईल फोन चोरीप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या दोघांकडून एकूण आठ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. हे दोघेही मूळचे पश्चिम बंगालचे आहेत.

बिपिन कुमार नारायण तांती (वय 32 वर्षे) यांनी याबाबत तक्रार केली. ते मादेळ, थिवी येथे कामगार आहेत. तर ते मूळचे दुलारपूर, तेघर बेगुसराय बिहार येथील आहेत.

शनिवारी सायंकाळी पाच वाजता कळंगुट बीचवर अज्ञातांनी दोन फोन चोरल्याची तक्रार त्यांनी दाखल केली होती. यातील एक फोन इन्फिनिट हॉट इलेव्हन हा होता तर दुसरा फोन सॅमसंगचा होता. दोन्ही मोबाईल फोनची एकत्रित किंमत 18,000 रूपये इतकी होते.

दरम्यान, पोलिसांच्या तपासात रकिब आलियाजम मुल्ला (वय 24) आणि रसिब अलियाजम मुल्ला (वय 22) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे दोघेही सध्या गोव्यातील पर्रा येथे वास्तव्यास आहेत. ते मूळचे संदारपूर दक्षिण दिनाजपूर, पश्चिम बंगाल येथील आहेत.

त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण 08 मोबाईल फोन्स हस्तगत केले आहेत. त्याची किंमत 1.5 रूपये इतकी आहे. पर्वरी एसडीपीओ आणि कळंगुट पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांच्या देखरेखीखाली या दोघा आरोपींकडे अधिक तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT