पणजी : वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गोवा पोलिसांनी कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. रीअल-टाइम तपासणीसाठी ॲप लॉन्च करण्याची योजना गोवा पोलिसांकडून आखण्यात येत आहे.
गोवा पोलिसांनी सांगितले की, पर्यटक, भाडेकरू, स्थलांतरित कामगार आणि गोव्याला भेट देणाऱ्या इतरांची ओळख पडताळण्याची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने सुव्यवस्थित करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.
इतर राज्यातून आलेले कामगार, पर्यटक किंवा भाडेकरू यांचा गुन्हेगारीमध्ये सहभाग आहे की नाही? किंवा आंतरराष्ट्रीय पर्यटकांची व्हिसाची मुदत संपली आहे की नाही? याची माहिती या ॲपच्या माध्यमातून समजणार आहे.
ॲपमुळे राज्यात होणार्या फसवणुकीचे प्रमाण कमी होईल. राज्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती मिळण्याची प्रक्रिया सुलभ होईल, अशी सरकारला आशा आहे.
गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (GEL) ला गोवा पोलिसांसाठी हा ॲप तयार करण्यास सांगितलं आहे. गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी गोवा पोलिसांना मदत करणे, हा या प्रणालीचा महत्त्वाचा उद्देश आहे.
गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीच्या ओळखीची पडताळणी करून प्राथमिक खबरदारी घेण्यासाठी, गोव्यातील नागरिकांची सुरक्षा आणि सुरक्षा वाढवणारी बुद्धिमान डिजिटल प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे.
सरकारने जारी केलेले ओळख पुरावे वापरणे, गुन्हेगारी नोंदी तपासणे हे या प्रणालीमुळे सहज शक्य होईल, असे गोवा पोलिसांनी सांगितलं.
हा ॲप पोलिसांना रहिवाशांसाठी संपूर्ण सुरक्षा आणि सुरक्षितता वाढविण्यात मदत करेल. रीअल-टाइम गुन्हेगारी नोंदी तपासण्यास, पडताळणी प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यास हा ॲप मदत करेल.
महिलांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे ॲप फायदेशीर ठरेल, असं गोवा पोलिसांनी सांगितलं. गोव्यातील सुमारे 90 टक्के गुन्हे बिहार, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातील स्थलांतरित मजुरांकडून होतात, असं राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले होते.
सप्टेंबरपासून गोवा पोलिसांनी भाडेकरू आणि घरगुती कामगारांच्या ओळखपत्रांची पडताळणी करण्यासाठी विशेष पडताळणी मोहीम सुरू केली आहे. गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी गोवा पोलिसांकडून अनेक योजना आखल्या जात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.