Srinivas Naik Firing Case Dainik Gomantak
गोवा

Srinivas Naik Firing Case: पोलिस शोधपथक मुंबईला, मारेकऱ्यांचे धागेदोरे नाहीच; माझे कुणाशीही भांडण नव्‍हते, श्रीनिवास नायकांचे स्पष्टीकरण

Casino Majestic Shooting: कॅसिनो मॅजेस्‍टिकचे संचालक श्रीनिवास नायक यांच्‍यावर गोळीबार करणाऱ्या संशयितांच्‍या शोधासाठी गोवा पोलिसांनी एक पथक मुंबईला पाठविले आहे

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: कॅसिनो मॅजेस्‍टिकचे संचालक श्रीनिवास नायक यांच्‍यावर गोळीबार करणाऱ्या संशयितांच्‍या शोधासाठी गोवा पोलिसांनी एक पथक मुंबईला पाठविले आहे. ‘‘माझे कुणाशीही भांडण नव्‍हते. माझ्यावरील हल्ल्‍याबाबतची सर्व माहिती मी पोलिसांना दिली आहे’’, असे नायक यांनी रविवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

शुक्रवारी रात्री ८.४५ च्‍या सुमारास पर्वरी येथील कॅसिनो मॅजेस्‍टिकमधून घरी जाण्‍यासाठी कारकडे निघालेल्‍या श्रीनिवास नायक यांच्‍यावर दोन अज्ञातांनी गोळीबार केला. त्‍यानंतर लगेच त्‍यांच्‍या सुरक्षा रक्षकानेही प्रत्‍युत्तरादाखल गोळीबार सुरू केल्‍यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला.

पर्वरी महामार्गालगत तसेच विधानसभा, पर्वरी पोलिस स्‍थानकापासून अगदी जवळ असलेल्‍या कॅसिनो मॅजेस्‍टिकबाहेर अशा पद्धतीचा गोळीबार झाल्‍याने राजकीय वातावरण तापले आहे. याप्रश्‍नी गोळीबार करणाऱ्यांना अजिबात सोडणार नसल्‍याचा इशारा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे.

‘‘नायक यांच्‍यावर गोळीबार सुपारी किलरनी केल्‍याचा संशय व्‍यक्त करून पोलिसांनी फरार झालेल्‍या अज्ञात संशयितांचा शोध घेण्‍यास सुरुवात केली आहे. संशयित मुंबईला पळाल्‍याचा संशय असल्‍याने पोलिसांचे एक पथक मुंबईला पाठवले आहे. गोळीबार करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक केले जाईल’’, असे पर्वरी पोलिस स्‍थानकाचे निरीक्षक तुकाराम चव्‍हाण यांनी सांगितले.

दरम्‍यान, राज्‍य विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्‍याआधीच राज्‍यात अशी गोळीबाराची घटना घडल्‍यामुळे राज्‍यातील कायदा आणि सुव्‍यवस्‍थेवरून सरकारला घेरण्‍याची तयारी विरोधी सातही आमदारांनी केली आहे. त्‍यामुळे या विषयावरून सरकार आणि विरोधकांत कामकाजाच्‍या सुरुवातीलाच पेटण्‍याची शक्‍यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT