जुने गोवे: दहा वर्षांमधून एकदा होणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा भव्य अवशेष प्रदर्शन सोहळा अलीकडेच पार पडला. या सोहळयाला अनेक भाविकांनी मोठी गर्दी केली आणि तरीही पोलिसांच्या सहकार्याने हा सोहळा नीट पार पडला. या सोहळ्याचे व्यवस्थित नियोजन व्हावे म्हणून विविध ठिकाणि पोलिसांना तैनात करण्यात आले होते आणि जबाबदारी पार पडताना ४५ दिवसांच्या या कार्यक्रमात पोलिसांनी १४० आरोपींच्या नावे विविध गुन्ह्यांची नोंद केली आहे.
उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी BNSS २०२३ च्या कलम ३५ (१) अंतर्गत ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, १०० जणांवर वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करण्यासारखे गुन्हे दाखल करण्यात आलेत तर १० लोकांवर भिकारी कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली आहे.
जुने गोवा पोलिसांनी चोरी आणि चेन स्नॅचिंग प्रकरणांवर यशस्वी कारवाई करत १.२८ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे चोरीचे सोने जप्त केले. त्यांनी दोन चोरीचे गुन्हे दाखल केले आणि सहा सदस्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला, तसेच एका प्रमुख चोराला अटक केली. जप्त केलेल्या सोन्यामध्ये अनुक्रमे ९५,००० आणि ३३,५०० रुपये किंमतीचे ३.१ ग्रॅम, ८ ग्रॅम आणि ५ ग्रॅम वजनाचे तुकडे होते.
बॅसिलिका ऑफ बॉम जीझस आणि से कॅथेड्रलच्या आजूबाजूच्या मोक्याच्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज वापरून गोवा पोलिसांनी महाराष्ट्राच्या एका माणसाला ताब्यात घेतलं आहे. याव्यतिरिक्त, पोलिसांनी तामिळनाडू येथील रहिवासी वसंत मणी याला मुंबईतील ट्रेनमधून चोरलेल्या लॅपटॉप आणि घड्याळासह २ लाख रुपयांच्या चोरीच्या मौल्यवान वस्तू बाळगल्याबद्दल अटक केली आहे.
४५ दिवस चालेल्या या सोहळ्यात सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी १,२०० पोलिस कर्मचारी आणि महत्वाच्या दिवशी अतिरिक्त ३२० अधिकारी तैनात करून मोठ्या प्रमाणात सुरक्षा ऑपरेशन हाती घेण्यात आले होते. शिवाय यामध्ये ४५० सीसीटीव्ही कॅमेरे आणि सहा एआय आधारित फेशियल रिकग्निशन उपकरणांचा समावेश होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.