Subhash Naik Death Case Dainik Gomantak
गोवा

Subhash Naik Death Case: अंत्‍ययात्रा निघणार तेवढ्यात प्रेत नेलं विच्‍छेदनासाठी, कुचेलीतील नाट्यमय घटना; घातपाताच्‍या संशयातून पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्‍यात

Subhash Naik Death Case: बार्देश तालुक्यातील कुचेली येथील रहिवासी सुभाष नाईक (६३) यांच्या मृत्यू प्रकरणाला शुक्रवारी (ता.१) नाट्यमय वळण मिळाले.

Manish Jadhav

म्हापसा: बार्देश तालुक्यातील कुचेली येथील रहिवासी सुभाष नाईक (६३) यांच्या मृत्यू प्रकरणाला शुक्रवारी (ता.१) नाट्यमय वळण मिळाले. नाईक यांच्या अंत्यविधीची तयारी पूर्ण झाली असताना आणि अंत्ययात्रा निघण्यास काही मिनिटे शिल्लक असतानाच, म्हापसा पोलिसांनी हस्तक्षेप करत मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी एका बार मालकासह स्वयंपाक्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष नाईक यांना गुरुवारी, कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते, जिथून त्यांना पुढील उपचारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. नंतर पुन्हा त्यांना जिल्हा रुग्णालयात आणले असता, शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा दुपारी मृत्यू झाला. रुग्णालयाने मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्यानंतर तो अंत्यविधीसाठी कुचेली येथील निवासस्थानी नेण्यात आला. सायंकाळी अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच, काही स्थानिकांनी नाईक यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत घटनास्थळी गोंधळ घातला. नाईक यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे घातपात असल्याची चर्चा सुरू झाली.

या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये नाईक यांनी शेवटच्या वेळी भेट दिलेल्या बारचा मालक तसेच संबंधित बारमधील स्वयंपाकी यांचा समावेश आहे. स्थानिक स्तरावर व्यक्त झालेला संशय आणि प्राप्त झालेली तक्रार पाहता, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे गूढ उकलणार आहे. सध्या म्हापसा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: थोडंही संतुलन बिघडलं तर खेळ खल्लास! मृत्यूला मुठीत घेऊन काकाची लखनौच्या रस्त्यावर खतरनाक स्टंटबाजी; भन्नाट स्वॅग व्हायरल

DigiLocker Alert: डिजीलॉकर युजर्ससाठी केंद्र सरकारचा मोठा इशारा; 'या' बनावट वेबसाईटवर चुकूनही क्लिक करु नका, बँक खाते होऊ शकते रिकामे

US Green Card New Rules: "आधी अमेरिका सोडा, मगच ग्रीन कार्डसाठी अर्ज करा!", ट्रम्प सरकारचा मोठा फेरबदल; भारतीयांवर काय परिणाम होणार?

VIDEO: "तुझ्या बापाचा रस्ता आहे का?", केदारनाथच्या दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेचा हाय-व्होल्टेज ड्रामा; खच्चर चालकाशी हुज्जत घालतानाचा व्हिडिओ व्हायरल

Dempo SC vs Sreenidi Deccan: धेंपो क्लबला अखेर बरोबरीचे समाधान, आयएफएल लढतीत श्रीनिदी डेक्कन संघाने 1-1 असे रोखले

SCROLL FOR NEXT