JEE Advanced Exam: जेईई -ॲडव्हान्स्ड परीक्षेत गोव्याच्या जोशुआची झेप! दिव्यांगामध्ये देशात 69 वा क्रमांक; 'IIT' प्रवेशाचा मार्ग मोकळा

Joshua D'Cruz Moyra Goa JEE Advanced 2026: बार्देश तालुक्यातील मोयरा येथील जोशुआ डिक्रूझ याने ''ऑल इंडिया जेईई (ॲडव्हान्स्ड) २०२६'' ही अत्यंत प्रतिष्ठेची आणि कठीण मानली जाणारी परीक्षा उत्तीर्ण करून गोव्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
JEE Advanced Exam
JEE Advanced ExamDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बार्देश तालुक्यातील मोयरा येथील जोशुआ डिक्रूझ याने ''ऑल इंडिया जेईई (ॲडव्हान्स्ड) २०२६'' ही अत्यंत प्रतिष्ठेची आणि कठीण मानली जाणारी परीक्षा उत्तीर्ण करून गोव्याचे नाव उज्ज्वल केले आहे. दिव्यांग प्रवर्गात त्याने देशभरातून ६९ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

विशेष म्हणजे, जेईई (ॲडव्हान्स्ड) परीक्षा उत्तीर्ण होणारा जोशुआ हा गोव्यातील पहिलाच दिव्यांग विद्यार्थी ठरला आहे. त्यामुळे त्याच्या या यशाचे राज्यभरातून कौतुक होत असून विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गोवा दिव्यांग हक्क संघटनेनेही त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

JEE Advanced Exam
Goa Forest Department: सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! वन विभागातील 'या' पदांवर दिव्यांगांना मिळणार आरक्षण; सरकारचा मास्टरप्लॅन काय?

आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचे ध्येय असलेल्या जोशुआने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्याने इयत्ता बारावीचे शिक्षण म्हापसा येथील सेंट झेवियर्स उच्च माध्यमिक विद्यालयातून पूर्ण केले असून दहावीपर्यंतचे शिक्षण होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये घेतले आहे.

जोशुआचे हे यश दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचे ते ज्वलंत उदाहरण मानले जात आहे.

JEE Advanced Exam
Goa Education: धक्कादायक! शालेय वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, 'SCERT'च्या परिपत्रकामुळे गोंधळ; शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम

गुणी संगीतकार!

शैक्षणिक क्षेत्रात चमकदार कामगिरी करणारा जोशुआ संगीत क्षेत्रातही तितकाच प्रगल्भ आहे. तो एक अष्टपैलू आणि गुणी संगीतकार असून तब्बल सहा वेगवेगळी वाद्ये वाजवण्याचे कौशल्य त्याच्याकडे आहे. अभ्यास आणि संगीत या दोन्ही क्षेत्रांमध्ये संतुलन साधत त्याने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Together For Mapusa NEET Protest
Goa tourist car accident
 NEET Exam Cancellation 2026
Mapusa Road Repair
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com