Anmod Ghat liquor seizure Dainik Gomantak
गोवा

Liquor Seized: गोवा बनावटीचे 35 लिटर मद्य जप्त! अनमोड चेकपोस्टवर कारवाई; कर्नाटकच्या चालकाला अटक

Goa Made Liquor Seizure: अनमोड तपासणी नाक्यावर झालेल्या कारवाईत राज्य अबकारी विभागाने सुमारे ५.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत गोवा बनावटीच्या ३५ लिटर दारूसह एक टोयोटा कार जप्त करण्यात आली

Sameer Panditrao

बेळगाव: अनमोड तपासणी नाक्यावर झालेल्या कारवाईत राज्य अबकारी विभागाने सुमारे ५.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत गोवा बनावटीच्या ३५ लिटर दारूसह एक टोयोटा कार जप्त करण्यात आली असून, संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई सकाळी अनमोड चेकपोस्टवर करण्यात आली. टोयोटा इटिओस (क्रमांक KA 05 AG 9984) या कारची थांबवून तपासणी केल्यावर कारच्या डिकीत एक मोठी प्लास्टिकची पिशवी आढळली. त्या पिशवीत गोवा बनावटीचे मद्य आढळले.

या कारमध्ये रॉयल स्टॅग २ लिटरच्या १० बाटल्या, रॉयल स्टॅग ७५० मि.ली.च्या ७ बाटल्या, इम्पिरियल ब्लू ७५० मि.ली.च्या ५ बाटल्या आणि बुलेट फेणीच्या ७ बाटल्या सापडल्या. एकूण मिळून ३५ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे, ज्याची अंदाजित किंमत ५२,९०० रुपये इतकी आहे. या दारूची वाहतूक बेकायदेशीररीत्या केली जात होती.

तस्करीसाठी वापरलेल्या या गाडीची अंदाजित किंमत ४.५ लाख असून, तीही जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ५.२९ लाखांपर्यंत पोहोचली आहे. या प्रकरणी कार्तिक वीरय्या हिरेमठ (रा. हट्टलगिरी रोड, गदग, कर्नाटक ) या संशयित आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई अबकारी उपनिरीक्षक टी. बी. मल्लण्णवर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांच्या सोबत महंतेश होन्नूर, ईरन्ना कुरुबेट, रवी संकण्णवर आणि रमेश राठोड हे कर्मचारी सहभागी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Chaturthi: 'या' वेळेत करा गणरायाची प्रतिष्ठापना! सुख, समृद्धी, ऐश्वर्याने भरेल घर; जाणून घ्या कारण

Arunachal Pradesh Landslide: कारवर कोसळले भलेमोठे दगड, प्रवासी थोडक्यात बचावले; अरुणाचल प्रदेशातील भूस्खलनाचा धडकी भरवणारा व्हिडिओ

Chess World Cup Goa: दिल्ली नाही 'गोवा'! FIDE चेस विश्वचषक 2025 ची घोषणा; जाणून घ्या वेळापत्रक

Dead Whale Fish: तळपण समुद्रकिनाऱ्यावर आढळला 30 फूट लांब कुजलेल्या अवस्थेतील व्हेल मासा

India America Relations: ट्रम्प यांनी 4 वेळा फोन केला, पण मोदींनी घेतला नाही? जर्मन मासिकाचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT