Illegal Beef Seized Dainik Gomantak
गोवा

Illegal Beef Seized: बेळगावातून गोव्यात बेकायदेशीर मांसाची तस्करी, 1930 किलो गोमांस जप्त; दोघे अटकेत

Goa Police Seize 1930 Kg of Illegal Beef: बेळगावहून गोव्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनातून तब्बल 1930 किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले.

Manish Jadhav

Goa Beef Trafficking: राज्यात गेल्या काही दिवसांत पुन्हा बेकायदेशीर गोमांस तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गोवा पोलिस गोमांस तस्करीला आळा घालण्यासाठी सातत्याने छापेमारी करत आहे. यातच आता, बेळगावहून गोव्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनातून तब्बल 1930 किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले. रामनगर पोलिसांनी गोमांसासह वाहन आणि 2 आरोपींना ताब्यात घेतले. ही घटना सोमवारी (7 जुलै) सकाळी घडली. सिद्धाप्पा बालपप्पा बंधुर आणि क्लीनर राजू बाळू नाईक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावहून गोव्याच्या (Goa) दिशेने (वाहन क्रमांक KA 25 AB 6640) येत असलेल्या वाहनातून तब्बल 1930 किलो गोमांस रामनगर पोलिसांनी जप्त केले. गोमांसासह पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले. ही घटना सोमवारी सकाळी घडली. रामनगर येथील शिवाजी सर्कलमधून सदर वाहन येत असताना रामनगर चर्च जवळ पोलिसांनी बेकायदेशीर गोमांसासह आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सदर गोमांसाची किंमत अंदाजे 67,5,500 असून याप्रकरणी आता ड्रायव्हर सिद्धाप्पा बालपप्पा बंधुर (राहणार, बेळगाव) तसेच क्लीनर राजू बाळू नाईक (राहणार, बेळगाव) या दोघांनाही कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. सदर कारवाई रामनगर पोलीस उपनिरीक्षक महांतेश नाईक यांच्या टीमने केली.

काही दिवसांपूर्वी, मोले तपासणी नाक्यावर सुमारे दोन टन गोमांस पोलिसांनी जप्त केले होते. बेळगावातून गोव्यात वाहतूक केली जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली होती. बेळगावातून गोव्यात 1,800 किलो गोमांस घेऊन येत असलेला टेम्पोची तपासणी मोले तपासणी नाक्यावर करण्यात आली. या तपासणीत पोलिसांना टेम्पोत मोठा गोमांस साठा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी गोमांसासह आरोपींना (Accused) ताब्यात घेतले. राज्यातील गोमांस तुटवडा लक्षात घेता इतर ठिकाणांवरुन राज्यात तस्करी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT