Online Fraud Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यात ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या 3 टोळ्यांचा पर्दाफाश, 5 परप्रांतीयांना अटक

Goa Cyber Fraud: उत्तर गोवा पोलिसांनी तीन मोठ्या वेगवेगळ्या प्रकरणांशी संंबंधित असलेल्या ऑनलाईन घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Sameer Panditrao

पणजी: उत्तर गोवा पोलिसांनी तीन मोठ्या वेगवेगळ्या प्रकरणांशी संंबंधित असलेल्या ऑनलाईन घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पर्यटकांना लक्ष्य करून त्यांची फसवणूक करणाऱ्या दिल्ली, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधील ५ जणांना अटक केली आहे.

त्यांच्याविरुद्ध फसवणूक तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस पथके स्थापन करून विविध राज्यांत पाठविली होती, अशी माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.

कर्नाटकातील बिदर येथील ४० वर्षीय दिलीप कुमार विश्‍वकर्मा याला ‘फेसबुक’च्या माध्यमातून होम स्टे बुक करणाऱ्या पर्यटकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याने पर्यटकांकडून आगाऊ पैसे घेतले आणि गोव्यात होम स्टेची व्यवस्था करण्याचे आश्‍वासन दिले होते.

पर्यटकांनी पैसे जमा केल्यानंतर संशयिताने त्यांचे मोबाईल क्रमांक ब्लॉक केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिस पथकाने संशयिताचा शोध घेऊन त्याला कर्नाटकमधून अटक केली. विश्‍वकर्माविरुद्ध अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी इतर राज्यांतही दाखल झाल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

‘सेक्स टॉय’ विक्री घोटाळाप्रकरणी गोवा पोलिसांच्या पथकाने कोलकाता - पश्‍चिम बंगालमधील ३७ वर्षीय शुभेंधू कुमार दास याला अटक केली. स्थानिक कंपनी असल्याचा दावा करत ई-कॉमर्स संकेतस्थळावर सेक्स टॉय विकण्याच्या बहाण्याने गोव्यात पर्यटकांची फसवणूक केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली.

पैसे मिळाल्यानंतरही कंपनीने कधीही उत्पादन दिले नाही. कारण नमूद केलेला व्यवसायाचा पत्ता हा अस्तित्वात नव्हता. या प्रकरणाची तक्रार पणजी पोलिसांत दाखल झाल्यानंतर पोलिस पथकाने या प्रकरणाचा शोध सुरू केला. अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संशयितांचा शोध घेत हे पथक कोलकाता येथे पोचले आणि त्याला ताब्यात घेऊन गोव्यात आणले.

सायबर फसवणूक आणि ऑनलाईन घोटाळ्यांवर सक्रियपणे कारवाई करून पर्यटक आणि रहिवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उत्तर गोवा पोलिस वचनबद्ध आहेत. या टोळ्या विशेषतः गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना लक्ष्य करत होत्या, त्यांच्या प्रवास योजना आणि ऑनलाईन व्यवहारांचा गैरफायदा घेत होत्या. त्यामुळे खातरजमा केल्याशिवाय कोणताही ऑनलाईन व्यवहार करू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी केले आहे.

जलक्रीडा तिकीट घोटाळा असा...

जलक्रीडा तिकीट घोटाळाप्रकरणी दिल्लीतील शादीपूर येथील मयंक जैन, हरिश जैन आणि बुदौन येथील शशांक वर्मा या तिघांना अटक केली आहे.

या तिघांनी जलक्रीडा तिकिटे पर्यटकांना ऑनलाईन पद्धतीने विकली होती. मात्र, गोव्यात आल्यावर या पर्यटकांना जलक्रीडेसाठी या तिकिटांद्वारे कोणतीच सेवा मिळाली नाही.

ज्या ऑपरेटर्सची नावे दिली होती, ते गोव्यात अस्तित्वातच नसल्याचे आढळले. जी सेवा देण्यासाठी जाहिरात केली होती, ती न देता वेगळीच सेवा देण्याचा प्रकार पर्यटकांना अनुभवास आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

SCROLL FOR NEXT