जसपाल सिंग, Goa Police News Updates, Goa DGP Jaspal Singh News Dainik Gomantak
गोवा

Goa Police: ड्रग्‍स, सायबर गुन्‍ह्यांप्रकरणी नवी व्यूहरचना

जसपाल सिंग: पोलिस महासंचालकपदाचा घेतला ताबा; लवकरच कृतिआराखडा ठरवणार

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्याचे नवे पोलिस महासंचालक जसपाल सिंग (1996 ॲग्मूट केडर) यांनी आज आपल्‍या पदाचा ताबा घेतला. त्यांची ही गोव्यात तिसऱ्यांदा बदली झाली आहे. आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची गोव्यात 1998 साली साहाय्यक अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबरोबरच वाहतूक, ड्रग्स व सायबर गुन्हे नियंत्रणात ठेवण्यासाठी नव्या व्यूहरचना सहकाऱ्यांशी चर्चा करून आखण्यात येतील, अशी प्रतिक्रिया सिंग यांनी पदाचा ताबा घेतल्यानंतर दिली. (Goa Police News Updates)

गोवा पोलिस खात्यात सिंग यांनी अंमलीपदार्थविरोधी कक्षाचे अधीक्षक म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांची वाहतूक पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली होती. ते दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक काम करताना त्यांची दिल्लीत बदली झाली होती. त्यानंतर ते पुन्हा पोलिस महानिरीक्षक म्हणून दुसऱ्यांदा बदली झाली होती. सुमारे तीन वर्षांच्या कालावधीनंतर त्यांची दिल्लीत बदली झाली. ते 2017 साली गोव्यात महानिरीक्षक म्हणून आले होते. पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांची बदली झाल्यानंतर एक वर्षाहून अधिक काळ रिक्त असलेला महासंचालकपदाचा ताबा त्यांनी कोविड काळात व्यवस्थितपणे हाताळाला होता.

दोन दशकापूर्वी पहिल्यांदा गोव्यात बदली झाली तेव्हा माझ्याकडे अंमलीपदार्थविरोधी कक्षाचा ताबा होता. आता बराच बदल घडला आहे. बऱ्या प्रमाणात ड्रग्‍स प्रकरणांवर नियंत्रण आले आहे. पूर्वी काही पर्यटक ड्रग्‍ससाठी गोव्यात यायचे, मात्र आता त्यात बदल होऊन पर्यटक गोव्याची संस्कृती, सौंदर्यता, निसर्गरम्यस्थळे तसेच सुरक्षितता यासाठी मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. आजच पदाचा ताबा घेतल्याने ड्रग्‍ससंदर्भात सहकाऱ्यांकडून आढावा घेऊन पुढील कृतिआराखडा ठरविला जाईल असे सिंग यांनी सांगितले.

सायबर गुन्‍हे रोखण्‍यासाठी डिजिटल तंत्रज्ञान जागृती हवी

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सायबर गुन्हे वाढत आहेत. यासंदर्भात बोलताना सिंग म्हणाले, या गुन्ह्यांच्या तपासकामासाठी तांत्रिक ज्ञान असण्याची गरज आहे. एखादा गुन्हा घडल्यास संशयिताच्‍या हाताच्‍या ठशांवरून त्याच्‍यापर्यंत पोहचता येते. मात्र सायबर गुन्ह्यांमध्ये काही धागेदोरे नसतात. डिजिटल प्लॅटफॉर्म तसेच संगणकाच्या आधारे शोध घेणे हे तंत्रज्ञानाचे काम आहे. यासाठी या क्षेत्राचे ज्ञान असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच डिजिटल तंत्रज्ञानाबाबत जनजागृती करणे अधिक महत्त्वाचे आहे, असे सिंग म्‍हणाले.

सायबर क्राईम, वाहतूक तसेच कायदा व सुव्यवस्थेवर अधिक भर दिला जाणार आहे. गोव्यात अगोदर काम केल्‍यामुळे येथील गुन्हेगारी व तपास यासंदर्भात माहिती आहे. देशातील सर्वोत्तम पोलिसांमध्ये गोवा पोलिसांचा क्रमांक लागतो. हा दर्जा कायम ठेवण्यासाठी सर्व प्रकारची आव्हाने पेलली जातील. गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने देशी-विदेशी पर्यंटकांची अधिक रेलचेल असते. गोवा ड्रग्ससाठी नव्हे तर पर्यटकांसाठी सुरक्षितस्थळ व्‍हावे यासाठी पावले उचलली जातील.

- जसपाल सिंग, पोलिस महासंचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT