Goa Cruise Operators SOP Dainik Gomantak
गोवा

Goa Cruise Operators SOP: रात्री दहा वाजता संगीत बंद म्हणजे बंद; पणजीतील क्रूझ व्यावसायिकांना पोलिसांची एसओपी

Goa Police Guidelines Cruises: पर्यटक गोव्याला आल्यानंतर क्रूझ सफरीचा नक्की आनंद लुटतात. मात्र दुसरीकडे, रात्री उशिरापर्यंत क्रूझवर संगीत कार्यक्रम क्रूझवर सुरु असतात.

Manish Jadhav

Goa News: गोव्यात लवकरच पर्यटन हंगाम सुरु होणार आहे. दरवर्षी गोव्याला देश-विदेशातील लाखो पर्यटक भेट देतात. तत्पूर्वी, पणजीतील क्रूझ व्यवसायिकांसोबत एसडीपीओ यांनी आज (18 ऑक्टोबर) बैठक घेतली. यावेळी, त्यांनी क्रूझ व्यवसायिकांना काही सूचना केल्या. क्रू सदस्यांच्या पडताळणीसह सुरक्षा उपकरणे ठेवण्याच्या सूचनांचा यामध्ये समावेश आहे.

पर्यटक गोव्याला (Goa) आल्यानंतर क्रूझ सफरीचा नक्की आनंद लुटतात. दुसरीकडे मात्र, रात्री उशिरापर्यंत क्रूझवर संगीत कार्यक्रम क्रूझवर सुरु असतात. हेच लक्षात घेवून एसडीओपी यांनी क्रूझ व्यवसायिकांना या सूचना केल्या आहेत. या सूचनांमध्ये रात्री दहा वाजता क्रूझवर संगीत बंद ठेवण्याची सूचना देखील आहे.

तसेच, पर्यटकांच्या (Tourists) दृष्टिकोनातूनही या सूचना महत्वाच्या आहेत. पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे क्रूझ व्यवसायिकांना पाहावं लागणार आहे. त्याचबरोबर, तिकीट काढण्यासाठी पर्यटन विभागाकडे 6 कर्मचाऱ्यांची नोंदणी अनिवार्य असणार आहे.

चला तर मग एसडीओपी यांनी क्रूझ ऑपरेटर्संना काय सूचना केल्या आहेत त्या जाणून घेऊया...

1. त्यांनी नियुक्त केलेल्या क्रू सदस्यांची पडताळणी करणे.

2. सक्षम अधिकाऱ्यांकडून योग्य परवानगी घेणे.

3. 22.00 वाजता साऊंड सिस्टिम बंद करणे.

4. सर्व सुरक्षा उपकरणे ठेवणे.

5. सर्व सुरक्षा उपायांची काळजी घेतली जाते का याची पाहणी करणे.

6. तिकीट काढण्यासाठी 6 कर्मचाऱ्यांची नोंदणी पर्यटन विभागाकडे अनिवार्य.

7. ग्राहकांकडे विशेष लक्ष देणे.

8. पर्यटकांना कोणताही अनुचित त्रास होणार नाही हे पाहणे.

9. पास/तिकीट जारी करणे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ministers Wealth: देशातल्या मंत्र्यांकडे पैसेच पैसे! भाजपमध्ये 14 अब्जाधीश, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर; वाचा ADR Report

Goa Cricket Coach: गोवा सीनियर महिला क्रिकेट प्रशिक्षकपदी नेहा तंवर! T-20 स्पर्धेने मोहिमेस होणार सुरवात

Goa Live Updates: शिरोडा येथे शुक्रवारी रात्री अंदाजे १० जणांनी ऋणाल केरकर याच्यावर हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा नोंद

पर्रीकरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायची असेल, तर विकास अडवू नका, त्याला गती द्या! डबल ट्रॅकिंग आणि कोळसा वाद

Missing Police Constable: ..घरच्यांनी सांगितले केरळला गेला! पोलिस कॉन्स्टेबल 2 वर्षे बेपत्ता; मायणा कुडतरीतील शिपायाला बडतर्फीची नोटीस

SCROLL FOR NEXT