Mobile Application For Tenant Verification Form Dainik Gomantak
गोवा

डोक्याला चालना द्या, गोवा पोलिसांना अ‍ॅप बनवायला मदत करा; जिंका कॅश प्राईज, जाणून घ्या सविस्तर

अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांना नाविण्यपूर्ण संकल्पना घेऊन येण्याचे आवाहन केले आहे.

Pramod Yadav

Goa Police: गोवा पोलिसांनी एक विशेष मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील भाडेकरूंची तपासणी करण्यासाठी हे अॅप्लिकेशन काम करेल.

अॅप्लिकेशन तयार करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांना नाविण्यपूर्ण संकल्पना घेऊन येण्याचे आवाहन केले आहे.

(Goa Police Invite Application To Create Mobile Application For Tenant Verification Form)

राज्यातील सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने गोवा पोलिस आणखी एक पाऊल टाकत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोवा पोलिस भाडेकरू पडताळणीवर भर देत आहेत.

गोव्यातील बिट्स पिलानी येथे 'क्रिएटथॉन 2023' आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होऊन "भाडेकरू पडताळणी फॉर्म" साठी DBMS सह एक नाविन्यपूर्ण APP तयार करा. असे आवाहन गोव्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी केले आहे.

या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून जमीन आणि मालमत्ता धारकांना भाडेकरू पडताळणी प्रक्रियेचे पालन करण्यात मदत होईल. असे जसपाल सिंग यांनी म्हटले आहे.

नियम आणि अटी

- "भाडेकरू पडताळणी फॉर्म" साठी DBMS सह एक नाविन्यपूर्ण APP तयार करणे.

- प्रत्येक ग्रुपमध्ये कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त दोन जण असावेत.

- चांगली संकल्पना देणाऱ्या गटाला प्रमाणपत्र आणि कॅश प्राईज (रोख रक्कम बक्षीस) दिले जाईल.

- 30 एप्रिल 2023 पर्यंत उमेदवारांना त्यांची संकल्पना आणि अर्ज बिट्स पिलानीचे प्राध्यापक संजय सहाय यांच्याकडे जमा करायच्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT