Puja Banerjee Kunal Verma Dainik Gomantak
गोवा

Puja Banerjee Kunal Verma: बंगाली चित्रपट निर्मात्याला डांबून लुटले! अभिनेत्री पूजा बॅनर्जी-कुणाल वर्माची कळंगुट पोलिसांकडून होणार चौकशी

Bengali Filmmaker Shyam Sundar Dey: ६० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केलेले पश्चिम बंगालमधील चित्रपट निर्माते श्यामसुंदर डे यांना गोव्यात डांबून ठेवून लुटल्याप्रकरणी आता २ जुलैपासून पोलिस तपास सुरू होणार आहे.

Sameer Amunekar

पणजी: ६० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केलेले पश्चिम बंगालमधील चित्रपट निर्माते श्यामसुंदर डे यांना गोव्यात डांबून ठेवून लुटल्याप्रकरणी आता २ जुलैपासून पोलिस तपास सुरू होणार आहे. या प्रकरणी तक्रारीत नाव नोंद असलेले अभिनेत्री पूजा बॅनर्जी आणि तिचे पती अभिनेता कुणाल वर्मा यांना कळंगुट पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.

खंडणी व अपहरणप्रकरणी त्या दोघांवर कळंगुट पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. बंगाली चित्रपट निर्माते श्याम सुंदर डे यांनी आरोप केला आहे की, गोव्यातील त्यांच्या वास्तव्यात पूजा व कुणाल यांनी त्यांचे अपहरण करून त्यांना चार दिवस एका व्हिलामध्ये बंदी बनवून ठेवले.

या काळात त्यांच्याकडून धमकी देत २३ लाख रुपयांची खंडणी वसूल केली. या घटनेची पहिली तक्रार श्याम यांच्या पत्नी मालबिका यांनी १२ जून रोजी कोलकात्यातील पोलिस ठाण्यात दाखल केली होती.

घटना उत्तर गोव्यात घडल्याने हे प्रकरण कोलकाता पोलिसांनी कळंगुट पोलिसांकडे वर्ग केले. बिधाननगर पोलिस आयुक्तालयाकडून कळंगुट पोलिसांना झिरो एफआयआर प्राप्त झाल्यानंतर गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, पूजा बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की,आम्ही कठीण काळातून जात आहोत. कुणाल वर्मा यांनी या प्रकरणी एकच बाजू समोर आलीय, असा दावा केला होता.

हायप्रोफाइल खंडणी प्रकरण

या खळबळजनक प्रकरणात अपहरण, जबरदस्तीने पैसे उकळणे, मारहाण आणि धमकी यांसह विविध गंभीर आरोप असून भारतीय न्याय संहितेतील अनेक कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये अपहरण, जबरदस्तीने कैद करणे, खंडणी, मारहाण आणि गुन्हेगारी धमकी यांचा समावेश आहे.

हे हायप्रोफाइल खंडणी प्रकरण आता अधिकच गडद होत चालले असून २ जुलैपासून सुरू होणाऱ्या तपासामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

Viral Video: 'दुचाकी की चालतं-फिरतं मृत्यूचं जाळं', चिमुकल्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या बापाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी सुनावले खडे बोल

Goa Panchayat Construction : कचरा कंत्राटदारांवर आता 'जीपीएस'ची नजर; विकसित गोवा पंचायत संमेलनात मुख्यमंत्र्यांचा मास्टर प्लॅन!

Lakshmi Narayan Rajyog: "बुध-शुक्राची जुळली युती, लक्ष्मी नारायण योगाची प्राप्ती!" परदेश प्रवासासोबत अचानक धनलाभाचे संकेत

Goa Murder Case: स्वीडिश पर्यटकाच्या आईचा लढा अपयशी? कोर्टाकडून सीबीआयचा 'क्लोजर रिपोर्ट' मंजूर; हत्येचा पुरावा न मिळाल्यानं तपास बंद

SCROLL FOR NEXT