Forensic Investigation Dainik Gomantak
गोवा

Goa Police: बलात्कार प्रकरणांचे फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यासाठी आता नवीन मार्गदर्शक तत्त्वे!

Goa News: नव्या एसओपीमुळे पुरावे अधिक शास्त्रीय, संवेदनशील पद्धतीने गोळा करण्यास मदत होणार आहे. तसेच, पीडिताची ओळख देखील गुप्त ठेवता येणार आहे.

Pramod Yadav

पणजी: बलात्काराच्या घटनांमध्ये फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे (SOP) जारी करण्यात आली आहेत. यामुळे लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा तपास करण्यात आणि खटला चालविण्यात अधिक मदत होणार आहे. जागतिक डिएनए दिनाच्या निमित्ताने पणजीतील पोलिस मुख्यालयात बुधवारी (३० एप्रिल) या एसओपी जारी करण्यात आल्या.

या कार्यक्रमाला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश भारती डांगरे आणि निवेदीता मेहता उपस्थित होते. गुन्ह्याचे फॉरेन्सिक पुरावे गोळा करताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी नव्या मार्गदर्शक तत्वांची मदत होणार आहे. यावेळी कायदेतज्ज्ञ, फॉरेन्सिक स्पेशालिस्ट आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला. नव्या एसओपीमुळे पुरावे अधिक शास्त्रीय, संवेदनशील पद्धतीने गोळा करण्यास मदत होणार आहे. तसेच, पीडिताची ओळख देखील गुप्त ठेवता येणार आहे.

पुरावे व्यवस्थित गोळा केलेले असल्यास गुन्ह्याचा निकाल व्यस्थित लागण्यास मदत होते. नवीन एसओपी पोलिस अधिकाऱ्यांसाठी पुरावे गोळा करण्यास दिशादर्शक ठरणार आहे, असे मत यावेळी उपस्थित तज्ज्ञांनी मांडले. महिलांविरोधात अनेक गुन्हे घडत असतात, यात बलात्काराची घटना सर्वात वाईट आहे. दरम्यान, लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यास अनेक पीडित आता समोर येऊन याबाबत तक्रार करतायेत, असे मत तज्ज्ञांनी मांडले.

बलात्काराच्या घटना कायदा आणि नैतिक जबाबदारीतून कशा हताळाव्यात याबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे माहिती देतात, असे गोवा पोलिस महासंचालक आलोक कुमार म्हणाले. अशा घटना पोलिसांनी देखील प्रोफेशनल, संवेदनशील आणि शास्त्रीय मार्गाने हताळाव्यात, असे आलोक कुमार म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT