Goa Crime News | Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: अमली पदार्थ दलालांच्या शोधार्थ गोवा पोलिस थेट हैदराबादला!

Goa Crime News: हैदराबाद येथून कोठून अमली पदार्थ आणले होते, याचा शोध घेण्यासाठी क्राईम ब्रँचचे पथक रवाना झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: हैदराबाद येथून गोव्यात ड्रग्स घेऊन आलेल्या संशयित यशवंत रेड्डी याला क्राईम ब्रँचच्या पोलिस पथकाने गेल्या आठवड्यात अटक केली होती. त्यामुळे ड्रग्‍स फक्त गोव्यातून हैदराबादला येत असल्याचा तेथील पोलिसांनी केलेला दावा गोवा पोलिसांनी फोल ठरविला आहे.

दरम्यान, संशयिताने हैदराबाद येथून कोठून ड्रग्‍स आणले होते, याचा शोध घेण्यासाठी क्राईम ब्रँचचे पथक रवाना झाले आहे. हैदराबाद पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी गोव्यातील काही ड्रग्‍सविक्रेत्यांना गोव्यात येऊन गजाआड केले होते व हैदराबादला येत असलेले ड्रग्‍स गोव्यातून पाठवले जात असल्याचा दावा केला होता.

तसेच, त्याला गोवा पोलिसांनी (Goa Police) रोखठोक उत्तर दिल्यानंतर हे आरोप-प्रत्यारोप बंद झाले होते. आता गोवा पोलिसांनीही हैदराबादहून गोव्यात येणाऱ्या पर्यंटकांची झडती घेण्यास सुरुवात केल्यावर तेथील दोन तरुणांना संशयावरून ताब्यात घेतले.

गोवा-हैदराबाद पोलिसांकडून धरपकड

हैदराबाद पोलिसांनी कळंगुट (Calungute) येथील प्रीतेश बोरकर याला ताब्यात घेऊनही त्याच्या अटकेची माहिती न दिल्याने गोवा व हैदराबाद पोलिस यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. त्यानंतर या दोन्ही पोलिसांनी एकमेकांच्या राज्यातील ड्रग्‍स दलालांची धरपकड सुरू केली होती.

हैदराबाद (Hyderabad) पोलिसांनी हिलटॉपचा मालक स्टीव्ह डिसोझा याला अटक केल्यानंतर कर्लिसचा चालक एडविन नुनीस यालाही अटक करण्यासाठी केलेले प्रयत्न अजूनही सफल झालेले नाहीत. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT