गोवा

Goa Police: हैद्राबाद पोलिसांना गोवा पोलिसांचे उत्तर, शोभित सक्सेना म्हणाले...

गोमन्तक डिजिटल टीम

हैद्राबाद पोलिसांनी गोवा पोलिसांवर सहकार्य न केल्याचा आरोप गुरूवारी केला. त्याला आता गोवा पोलिसांनी उत्तर दिले आहे. हैद्राबाद पोलिसांकडून कसलीही विचारणा झाली नसल्याचे गोवा पोलिसांनी म्हटले आहे. हैद्राबाद पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात सोनाली फोगाट प्रकरणातील संशयित आरोपी अॅडविन नुनिस याच्याबाबत विचारणा केली असता, गोवा पोलिसांनी सहकार्य न केल्याचा आरोप हैद्राबादचे पोलिस अधिक्षक सी. व्ही. आनंद (Hyderabad CP C.V Anand) यांनी केला.

हैद्राबाद पोलिसांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना उत्तर गोव्याचे पोलिस अधिक्षक शोभित सक्सेना (North Goa SP Shobit Saksena) म्हणाले, अॅडविन नुनिस अटके प्रकरणी हैद्राबाद पोलिसांकडून कोणत्याही प्रकारच्या सहकार्याची विचारणा झाली नाही. उस्मानिया विश्वविद्यालय ड्रग्ज प्रकरणातील 173 आरोपी पैकी एक अॅडविन नुनिस आहे. असे म्हणत सक्सेना यांनी हैद्राबादचे पोलिस अधिक्षक सी. व्ही. आनंद यांच्या आरोपांचे खंडन केले.

पोलिस अधिक्षक सी. व्ही. आनंद काय म्हणाले होते.

फोगाट प्रकरणातील आरोपी आणि कर्लिस बारचा मालक आणि केअरटेकर अॅडविन नुनिस हा ड्रग्ज प्रकरणात हैद्राबाद पोलिसांना हवा आहे. याबाबत गोवा पोलिसांना विचारणा केली असता त्यांच्याकडून हवे ते सहकार्य होत नाही. तसेच, प्रत्येकवेळी निगेटिव्ह रिझल्ट मिळतो. असा आरोप सी. व्ही. आनंद यांनी केला होता.

दरम्यान, आता या प्रकरणावरून गोवा पोलिस आणि हैद्राबाद पोलिस यांच्यात वाक् युद्ध सुरू झाल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे सोनाली फोगाट हत्याप्रकरणात (Sonali Phogat Murder Case) संशयित एडवीन नुनीस, दत्तप्रसाद गावकर व रामा मांद्रेकर यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एनडीपीएस (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act) कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी सहा सप्टेंबर रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Lung Cancer: फुफ्फुसाच्या कर्करोगाचा तरुणाईला विळखा, 50 वर्षांखालील 21 टक्के लोकांना जखडलं; जाणून घ्या का वाढतोय धोका?

Goa Assembly Session: गोव्यात पर्यटक घटले! सरकारने आत्मचिंतन करावे- विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

महाराष्ट्र, कर्नाटकात दारु तस्करी रोखण्यासाठी गोवा सरकारचा मोठा निर्णय, सीमेवर उभारणार तपासणी नाका Video

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

SCROLL FOR NEXT