Goa Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case: 1 हजार कोटींची फसवणूक! गोव्यातील चौगुले कंपनीच्या सल्लागारासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Goa Police: राज्यातून एक फसवणूकीचे प्रकरण समोर आले आहे. चौगुले समूहाच्या चौगुले ॲंड कंपनीची तब्बल 1075 कोटींची फसवणूक करण्यात आली.

Manish Jadhav

Chowgule & Company: राज्यातून एक फसवणूकीचे प्रकरण समोर आले आहे. चौगुले समूहाच्या चौगुले ॲंड कंपनीची त्यांच्याच कंपनीतील लोकांनी तब्बल 1075 कोटींची फसवणूक केली. आता गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने चौगुले ॲंड कंपनीच्या दोन सल्लागारांसह सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवला.

दरम्यान, चौगुले कंपनीच्या रुद्रा कंपनीने इंग्लंडमधील प्रताप शिर्के यांच्या कंपनीला तब्बल एक हजार कोटींचं लोन दिलं होतं. विशेष म्हणजे, आर्थिक सल्लागार विजय चौगुले आणि रोदीप महात्मे यांनी संचालक बोर्डाला यासंबंधीचे निर्देश दिल्यानंतर या कंपनीला एवढ्या कोटींचं लोन देण्यात आलं. मात्र हे लोन देण्यासाठी संचालक बोर्डानं मान्यता दिली नव्हती.

एवढंच नाहीतर महात्मे, चौगुले आणि प्रताप शिर्के यांच्या सांगण्यावरुन या इंग्लंडमधील कंपनीचे लोन माफही करण्यात आलं. त्यामुळे चौगुले ॲंड कंपनीला तब्बल एक हजार कोटींचं नुकसान झाल्याचं हर्ष शाह यांच्याकडून गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाला सांगण्यात आल्याचे तक्रारीत म्हटलं.

दुसरीकडे, शाह यांची फसवणूकीची तक्रार आल्यानंतर तात्काळ आर्थिक गुन्हे विभागाकडून विजय, चौगुले, रोदीप महात्मे तसेच प्रताप शिर्के यांच्यासह फोर्ट ग्रुप, मारिया पुंचेर, ज्ञात आणि अज्ञात असोसिएट्स यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT