Police Force and Traffic Arrangements Old Goa Dainik Gomantak
गोवा

St. Francis Xavier Exposition: एक्सपोजीशन सोहळ्यावर गोवा पोलिसांची करडी नजर; सुरक्षेसाठी १,५०० पोलीस कर्मचारी तैनात

Police Force and Traffic Arrangements: भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक आटोक्यात राहण्यासाठी गोवा पोलिसांनी वाहतूक पोलिसांसह मिळून पोलिस कर्मचारी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Akshata Chhatre

ओल्ड गोवा: नोव्हेंबर महिना गोवेकरांसाठी खास असणार आहे, कारण नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या प्रदर्शनाला देश-विदेशातून अनेक भाविक भेट देणार आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक आटोक्यात राहण्यासाठी गोवा पोलिसांनी सोमवारी (दि. ११ नोव्हेंबर) रोजी वाहतूक पोलिसांसह मिळून एकूण १,५०० पोलिस कर्मचारी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रदर्शनात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी ही बैठक घेतली होती. अशा मोठ्या कार्यक्रमांचं निमित्त साधून अनेकवेळा गुन्हेगार घुसखोरी करतात, यांपासून यात्रेकरूंचे सौरक्षण व्हावे तसेच दरम्यान वाढणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही आखणी करण्यात आल्याची माहिती डीजीपी आलेख कुमार यांनी दिली.

प्रदर्शनावेळी केंद्रामधून पोलीस अधिकारी बोलावले जाणार नाहीत, गोवा पोलीस स्वतः संपूर्ण जबाबदारी संबळणार आहेत. यात्रेकरूंची गोवा यात्रा सुरक्षित व्हावी म्हणून चेक पोस्टवर तैनाद असलेल्या पोलिसांना आवश्यक सर्व सूचना दिल्या जातील.

हा सोहळा कोणत्याही अडचणी शिवाय पार पडावा तसेच येणाऱ्या काही दिवसांत गोव्यात आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे आणि त्यांनतर डिसेंबरमध्ये नववर्षाचे स्वागत देखील केले जाणार आहे आणि या सोहळ्यांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलीस सराव करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT