Durgadas Kamat, CM Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: NCB च्या कारवाईनंतर 'गोवा फॉरवर्ड'चा थेट CM वर निशाणा; म्हणे, सरकारी आशिर्वादाशिवाय...

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drugs Case गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना गोव्यातील हा ड्रग व्यवहार बंद करण्याची राजकीय इच्छाशक्ती नाही किंवा या बेकायदेशीर व्यवहारातून त्यांना फायदा होत असावा. सरकारी आशिर्वाद असल्याशिवाय असे धंदे गोव्यात चालू राहणे शक्यच नाही असा आरोप गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी केला आहे.

मुंबई येथील केंद्रीय अमली पदार्थ विभाग पथकाने हरमल येथे धाड घालून मोठ्या प्रमाणावर चालणारे ड्रग रॅकेट उघडकीस आणले आहे.

या पार्श्वभूमीवर गोव्यातील पोलीसांच्या नाकासमोर चालू असलेले व्यवहार कसे बिनबोभाट चालू आहेत हे सिद्ध होते अशी टिका गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी केली आहे.

या पूर्वी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गोव्यात ड्रग्ज कार्टेल चालू असून गोवा पोलिस त्याच्यावर कसलीच कारवाई करत नाही असे म्हटले होते. त्यांचा हा आरोप खरा असल्याचे या आजच्या गोष्टीवरून सिद्ध झाले आहे असे कामत यांनी म्हटले आहे.

यापूर्वी हैद्राबाद पोलिसांनी गोव्यातील ड्रग्स डीलरना अटक केली होती. आता मुंबईच्या पोलीसांनी करवाई केली आहे. यावरून गोवा पोलिसांची अकार्यक्षमता पुन्हा एकदा स्पष्ट झाली.

एकतर गोव्यातील पोलीस या कारवाईच्या बाबतीत अकार्यक्षम आहेत किंवा ते जाणुन बुजून त्याकडे दुर्लक्ष करत आहेत हे सिद्ध झाले आहे असे कामत यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT