Mavin Gudinho, Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

मंत्री माविन, बाबूश यांना दिलासा, 'त्‍या' बहुचर्चित प्रकरणांना आव्‍हान न देण्‍याचा पोलिसांचा निर्णय

Goa Police High Court appeal: गोवा पोलिसांनी मंत्री माविन गुदिन्‍हो यांच्‍या कथित वीज घोटाळा आणि मंत्री बाबूश मोन्‍सेरात यांच्‍या बलात्‍कार प्रकरणाला उच्च न्‍यायालयात आव्‍हान न देण्‍याचा निर्णय घेतला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्‍य विधानसभा निवडणूक अवघ्‍या सात महिन्‍यांवर आली असतानाच गोवा पोलिसांनी मंत्री माविन गुदिन्‍हो यांच्‍या कथित वीज घोटाळा आणि मंत्री बाबूश मोन्‍सेरात यांच्‍या बलात्‍कार प्रकरणाला उच्च न्‍यायालयात आव्‍हान न देण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे मंत्री माविन आणि बाबूश यांच्‍यामागील कायदेशीर कटकट संपणार आहे.

मंत्री गुदिन्‍हो यांचे कथित वीज घोटाळा प्रकरण आणि मंत्री मोन्‍सेरात यांच्‍या विरोधातील बलात्‍कारप्रकरणी कनिष्‍ठ न्‍यायालयांमध्‍ये अनेक वर्षे सुनावण्‍या सुरू होत्या. अंतिम सुनावण्‍यांनंतर न्‍यायालयांनी या दोन्‍ही मंत्र्यांची निर्दोष मुक्तता केली होती.

याबाबत गोवा पोलिसांनी संबंधित सरकारी वकिलांच्या शिफारसी स्वीकारल्या असून, या वकिलांनी हे खटले उच्च न्यायालयात आव्‍हान देण्‍यासाठी योग्य नसल्‍याचा सल्ला पोलिसांना दिला आहे.

त्‍यामुळे पोलिसांनी या खटल्‍यांना उच्च न्‍यायालयात आव्‍हान न देण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे कनिष्ठ न्यायालयांनी दिलेले निर्दोष मुक्ततेचे निर्णय आता अंतिम ठरणार असून, या दोन्‍ही प्रकरणांवर कायमचा पडदा पडणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT