Goa Cyber Crime Canva|Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: फसवणुकीसाठी तब्बल '50 बँक खात्यांचा' वापर! गोवा पोलिसांच्या कारवाईत महाराष्ट्रातील दोघांना अटक

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police Cyber Crime Branch Action

पणजी: गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने जालना - महाराष्ट्र येथील नोमन तांबोळी (२०) व अभय दांडगे (२२) या दोघांनी शेअर ट्रेडिंगमध्ये ११.६० लाखांची फसवणूक केल्याने त्यांना शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे १० हजारांची रोख रक्कम, एक धनादेश बुक, एक पासबुक व ४ मोबाईल्स जप्त केले आहेत. या सायबर गुन्ह्यासाठी संशयितांनी आतापर्यंत देशातील विविध भागात सुमारे ५० बँक खात्यांचा वापर केला असल्याची माहिती समोर आली आहे, अशी माहिती क्राईम ब्रँच पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

संशयितांनी व्हॉट्सॲप ग्रुप शेअर ट्रेडिंगसंदर्भात माहिती देऊन त्याच्या बदल्यात भरमसाट रक्कमेचा परतावा देण्याचे आश्‍वासन देण्याची मोडस ऑपरेंडी वापरण्यात येत होती. त्याला वास्को येथील एक तरुण बळी पडला होता. त्याला ११.६० लाख रुपये व्हॉट्सॲपवर देण्यात आलेल्या बँकेच्या विविध खात्यात जमा करण्यास सांगितले व त्याच्या बदल्यात मोठी रक्कम परतावा म्हणून दिली जाईल असे सांगितले.

त्यानुसार या तरुणाने ४ लाख ९० हजार रुपये संगणकाच्या साहाय्याने संशयितांनी व्हॉट्सॲपवर दिलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या खात्यावर जमा केले होते. हे खाते आदेश पर्चा याच्या नावावर होते. रक्कम जमा करताच ती त्या खात्यावरून त्याच दिवशी काढण्यात आली होती.

जमा होणारी रक्कम काढून देण्यासाठी अभय दांडगे नामक तरुणाला प्रत्येकवेळी हजार रुपये कमिशन दिले जात होते. या चौकशीदरम्यान नोमन तांबोळी याचे नाव समोर आले होते. पोलिसांनी त्याला जालना - महाराष्ट्र येथून अटक केली. त्याच्याकडून अभय याला ५ हजाराचे कमिशन मिळत होते.

या सायबर गुन्ह्यामधील मुख्य सूत्रधार नोमन तांबोळी याने गोवा पोलिस आपल्या मागावर असल्याची चाहूल लागताच त्याने जालना - महाराष्ट्र येथून पलायन केले होते. गोवा पोलिसांनी त्याचा मागोवा घेत त्याला मुंबई विमानतळाजवळील एका हॉटेलातून ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीसाठी त्याला गोव्यात आणण्यात आले आहे. त्याच्याकडून १० हजार रुपये, ३ मोबाईल्स, ५० बँक खाती तसेच अभय दांडगे याच्याकडून एक मोबाईल, एक धनादेश बुक व एक पासबुक जप्त केला आहे.

स्टॉक मार्केटमध्ये सोशल मिडिया व व्हॉट्सॲपवरून ऑनलाईन पद्धतीने पैसे गुंतविताना सतर्क रहावे. रक्क ट्रान्स्फर करण्यापूर्वी त्या बँक खात्याची खातरजमा करावी. जेव्हा फसवणूक करणारे विविध बँक खात्याचे क्रमांक देतात, तेव्हा लोकांनी अधिक सावध रहायला हवे. खात्यावरील पैसे काढल्यावर ती खाती गोठवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा खात्यासंदर्भात संशय आला तरी जवळच्या पोलिस स्थानकात माहिती द्यावी.
राहुल गुप्ता, पोलिस अधीक्षक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी पावलं गोव्याच्या दिशेने वळणार; यंदा विदेशी पर्यटकांची संख्या वाढणार

Pitrupakasha 2024: श्राद्ध आणि महालय यात फरक आहे का? सर्वपित्री अमावस्या म्हणजे काय?

Ponda Crime: संसार सोडून 'त्या' दोघी गोव्यात, कारमधून आलेल्या तरुणांनी केलं अपहरण; तपासात उघड झाला चक्रावून टाकणारा घटनाक्रम

Goa Tourism: परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकारचं खास प्लॅनिंग; कोविड नंतर आकड्यात झालीये का वाढ?

Goa Monsoon: नको रे बाबा पाऊस! सासष्टीत अतिवृष्टीमुळे भातपिकाची नासाडी; शेतकरी चिंतातुर

SCROLL FOR NEXT