Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Police: धक्कादायक ! पोलिसांनीच केले पीडितेला संशयिताच्या स्‍वाधीन, वेर्णा येथे घडली होती घटना

धक्कादायक माहिती उघड : कुटुंबीय रागावले म्हणून गेली होती बाहेर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police गोव्‍यात महिला व अल्‍पवयीन मुलींवर लैंगिक अत्‍याचार वाढल्‍याची माहिती विधानसभा अधिवेशनातून समोर आली असतानाच वेर्णा येथे काही दिवसांपूर्वी बलात्‍कार झालेल्‍या एका 14 वर्षीय अल्‍पवयीन मुलीला पोलिसांनीच संशयित लक्ष्‍मण लमाणी याच्‍या स्‍वाधीन केल्‍याची माहिती उघड झाली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून संशयिताने जामिनासाठी बालन्‍यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर येत्‍या सोमवारी निवाडा होणार आहे.

या जामीन अर्जाविरोधात पीडितेच्‍या वतीने तिच्‍या पालकांनी हस्‍तक्षेप याचिका दाखल केली होती. बालन्‍यायालयाच्‍या न्‍यायाधीश सायोनारा लाड यांच्‍यासमोर पीडितेची बाजू मांडताना ॲड. अमेय प्रभुदेसाई यांनी ही गंभीर गोष्‍ट न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून दिली.

दरम्‍यान, पीडितेवर लैंगिक अत्‍याचार झाल्‍याचे वैद्यकीय तपासणीत सिद्ध झालेले नाही, असा दावा करून संशयिताने जामिनासाठी बालन्‍यायालयात अर्ज केला होता. आज या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली. मात्र, अर्जावरील निवाडा सोमवारपर्यंत राखून ठेवला आहे.

...अन् प्रकरणाला फुटली वाचा

ही घटना ४ जुलै रोजी रात्री घडली. अत्‍याचाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्‍याची धमकी संशयिताने पीडितेला दिली. त्‍यामुळे तिने ही गोष्‍ट कुणाला सांगितली नाही. मात्र ‘मी गोव्‍यात राहणार नाही, मला गावाला पाठवा’ असा तगादा तिने आई-वडिलांकडे लावला असता खोदून प्रश्‍‍न विचारल्‍यावर तिने कैफियत सांगितली. त्‍यानंतर संशयिताला ६ जुलै रोजी अटक करण्‍यात आली.

नेमके काय आहे प्रकरण?

घरच्‍यांनी रागावल्‍यामुळे ती मुलगी घरातून निघून गेली. रात्रीच्‍या वेळी एके ठिकाणी ती बसलेली एका इसमाने पाहिल्‍यानंतर त्याने तिला वेर्णा पोलिस स्‍थानकात नेले. या प्रकरणात ज्‍याच्‍यावर आरोप ठेवला आहे, त्‍या लक्ष्‍मण लमाणी याने यापूर्वी कित्‍येक प्रकरणांत पोलिसांसाठी पंच म्‍हणून काम केले आहे.

ही मुलगी त्‍याच्‍याच वस्‍तीत राहणारी असल्‍यामुळे पोलिसांनी त्‍याला रात्री पोलिस स्‍थानकात बोलावून घेतले. ‘आपण या मुलीला ओळखतो’ असे सांगितल्‍यावर ‘तिला घरी नेऊन सोड’ असे सांगून पोलिसांनी तिला त्‍याच्‍या स्‍वाधीन केले. मात्र, संशयिताने तिला घरी सोडण्‍याऐवजी निर्जनस्‍थळी नेऊन तिच्‍यावर बलात्‍कार केला, असे ॲड. प्रभुदेसाई यांनी न्‍यायालयात सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याच्या गणेशोत्सवात रमली अभिनेत्री समीरा रेड्डी; फोटो शेअर करत म्हणाली, 'ही नवी सुरुवात...'

Goa Film Shooting: फिल्म इंडस्ट्रीला सावंत सरकारचं 'गिफ्ट', गोव्यातील शूटिंगसाठी आता सिंगल-विंडो सिस्टिम; वेळ आणि पैशाची होणार बचत

धक्कादायक! नववीत शिकणाऱ्या मुलीने सरकारी शाळेच्या वॉशरुममध्ये दिला बाळाला जन्म

गाडी चालवताना आला दारुचा वास, गोव्यात Drink & Drive प्रकरणी केरळचा नागरिक दोषी; कोर्टाने ठोठावला 10,000 दंड

Duleep Trophy 2025: 21 वर्षाच्या पोराचा जलवा! दहा दिवस आधी रणजीमध्ये शतक, आता दुलीप ट्रॉफीतही ठोकलं ताबडतोब शतक; 'दानिश'ची कमाल

SCROLL FOR NEXT