cm pramod sawant Dainik Gomantak
गोवा

St Francis Xavier Controversy: यू-ट्यूबर गौतम खट्टरची उलटगणती सुरु! दोन दिवसांत होणार अटक, मुख्यमंत्री सावंतांचा कडक इशारा; तपास 'क्राईम ब्रांच'कडे!

Goa Police Crime Branch: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी यू-ट्यूबर गौतम खट्टरविरोधात वास्को पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास आता गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी यू-ट्यूबर गौतम खट्टरविरोधात वास्को पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास आता गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. त्‍याला दोन दिवसांत अटक करू, असे आश्‍‍वासन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे.

उपलब्‍ध माहितीनुसार, गोवा पोलिसांचे पथक गौतम खट्टर याच्या निवासस्थानी पोहोचले होते; मात्र तो तेथे उपस्थित नव्हता. खट्टर याला देश सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी सर्व विमानतळांवर ‘लुक आऊट सर्क्युलर’ जारी केले जाण्याची शक्यता आहे. गुन्हे शाखेच्या पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, खट्टरला लवकरात लवकर अटक करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तपासासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून विविध राज्यांमध्ये शोधमोहीम राबवली जात आहे.

धार्मिक भावना दुखावणे तसेच दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वक्तव्य केल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी खट्टरविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ आणि कलम १९६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार, वास्को पोलिस निरीक्षकांना मूळ केस डायरी, एफआयआरची प्रत, साक्षीदारांचे जबाब तसेच सर्व दस्‍तावेज तातडीने रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

‘सनातन धर्म’कडून माफी

मुरगाव सनातन धर्म रक्षा समितीने गौतम खट्टर याने केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध केला आहे. तसेच या विधानापासून स्वतःला दूर ठेवले असून या प्रकाराशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाषणावेळी खट्टर याला थांबवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याने ऐकले नाही, असा दावा समितीने केला आहे. तसेच समितीने ख्रिश्चन बांधवांची जाहीर माफीही मागितली आहे.

गौतम खट्टरचा शोध घेण्यासाठी गोवा पोलिसांचे एक पथक डेहराडूनला रवाना करण्यात आले आहे. हे पथक तेथे पोहोचले असून चौकशीही सुरू केली आहे. या पथकात एक पोलिस उपनिरीक्षक व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. - संतोष देसाई, पोलिस अधीक्षक (दक्षिण गोवा)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आरजी'मधील घडामोडी गोव्यातील परंपरेला धरूनच

पंधरा वर्षांनंतर राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण!

Goa Air India: गोव्याकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या फेऱ्यांत कपात; पावसाळी पर्यटनावर होणार परिणाम, इंधनदर वाढीचा फटका

Viral Video: विमानाची टक्कर झाली अन् हवेतच पॅराशूट फाटला... मृत्यूच्या दाढेतून 44 वर्षांची महिला थोडक्यात वाचली; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Goa Fraud Cases: गोव्यातून थेट दुबईत ठोकली धूम! तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंडचा पोलिसांना चकमा; लुकआऊट नोटीस जारी

SCROLL FOR NEXT