Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी महाराष्ट्रातील 20 वर्षीय तरुणाला अटक

Colvale Drug Raid: कोलवाळ येथील हाऊसिंग बोर्ड येथे पोलिसांनी छापेमारी केली. या छापेमारीत महाराष्ट्रातील तरुणाला अटक करण्यात आली.

Manish Jadhav

गेल्या काही दिवसांमध्ये गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधातील धडक कारवाया वाढल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी, म्हापसा येथून पोलिसांनी तब्बल 4 किलो गांजा जप्त केला होता. यातच आज (11 ऑक्टोबर) कोलवाळ येथील हाऊसिंग बोर्ड येथे पोलिसांनी छापेमारी केली. या छापेमारीत महाराष्ट्रातील तरुणाला अटक करण्यात आली. हा तरुण महाराष्ट्रातील सांगली येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.

शाहिद रईस मोहम्मद पटेल (वय, वर्ष 20) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 718 ग्रॅम एवढा गांजा जप्त केला, ज्याची किंमत 71,800 एवढी असल्याचे सांगितले जात आहे. गांजाशिवाय, शाहिदकडून एक मोटारसायकल, मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. आरोपी शाहिदला अटक करण्यात आली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

दरम्यान, पोलिसांना यासंबंधी गुप्तहेरांकडून माहिती मिळाली होती, ज्याच्याआधारे निखिल पालेकर यांच्या नेतृत्वाखालील टीमने ही कारवाई केली. आरोपीवर NDPS कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.

पश्चिम बंगालमधील तरुणास अटक

काही दिवसांपूर्वी, अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील (West Bengal) तरुणाला गोवा पोलिसांनी अटक केली होती. पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई, पोलिस उपनिरीक्षिक स्नेहा सवाल यांनी धाड टाकून संशयितास ताब्यात घेतले होते. सुकुमार अमल महांता (वय वर्षे 27) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव होते. तो मोरजी येथील ला काबुना हॉटेलमध्ये काम करत होता. त्याच्याकडे तब्बल 1723 ग्रॅम अमली पदार्थ आढळून आला होता, ज्याची किंमत 1 लाख 80 हजार रूपये इतकी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

SCROLL FOR NEXT