Sainath Kharpalkar Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : साखळी येथे दुचाकीच्या अपघातात पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू

दुचाकीची धडक उभ्या असलेल्या चारचाकीला बसून भीषण अपघात

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident : गेले काही दिवस राज्यातील अपघातांचं सत्र सुरूच आहे. अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबत ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जातेय. राज्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून विविध उपाययोजना आखण्यात येतायत. पण अद्यापही अपघातांना आळा घालण्यात हवं तसं यश मिळालेलं नाही.

अशातच साखळी येथे बुधवारी रात्री उशिरा एका दुचाकीचा अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून मृत दुचाकीस्वार राज्यातील पोलीस दलात कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत होता. ही घटना साखळी येथील सरकारी हॉस्पिटलाजवळ घडल्याची माहिती मिळाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अपघातातील मृत पोलिस कॉन्स्टेबलचे नाव साईनाथ खरपालकर असे असून, ते पर्ये-सत्तरी येथील रहिवासी होते. सध्या ते साखळी येथे वास्तव्यास होते. मयत साईनाथ हे आपल्या दुचाकीवरून जात होते यावेळी साईनाथची दुचाकीची धडक उभ्या असलेल्या चारचाकीला बसली. या धडकेत साईनाथ गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत साईनाथ यांचे सहा महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. साईनाथ हा सुस्वभावी होता. त्याच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Supply: '2047 पर्यंत आवश्यक पाण्याची तजवीज 2 वर्षांत करणार', जलसंपदा मंत्री शिरोडकरांचा दावा

Goa Crime: चिंताजनक! गोव्‍यासह देशभरात महिलांवरील अत्‍याचारांत वाढ; NCRBच्या अहवालातून माहिती उघड

Goa Rain: ..लो मैं आ गया! पुन्हा पावसाची वापसी, विजांसह कोसळणार सरी; 2 दिवस यलो अलर्ट जारी

Goa Politics: खरी कुजबुज; बिहारमधील फॉर्म्युला गोव्यात?

Goa To Indore Flight: खुशखबर! गोवा ते इंदूर विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून सुरू; दिल्लीतून आणखीन 3 विमाने येणार

SCROLL FOR NEXT